TRENDING:

सोन्याची जेजुरी... ‘सोमवती’साठी खंडोबा गडावर लाखोंची गर्दी

Last Updated:
महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरी गडावर दिवाळीतील सोमवती अमावस्येला मोठा उत्सव असतो.
advertisement
1/9
सोन्याची जेजुरी... ‘सोमवती’साठी खंडोबा गडावर लाखोंची गर्दी
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर आज सोमवती अमावस्या यात्रा साजरी करण्यात येत आहे. यानिमित्त राज्यभरातून लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलीय.
advertisement
2/9
भंडाऱ्याच्या उधळणीनं संपूर्ण जेजुरी गड न्हाऊन निघाला असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. सकाळपासून भाविकांनी गडावर खंडोबाच्या दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. 
advertisement
3/9
भंडाऱ्याची उधळण करत मोठ्या भक्तीभावाने सोमवती अमावस्येनिमित्त पालखी सोहळा सुरू झाला.
advertisement
4/9
हा पालखी सोहळा कऱ्हा नदीकडे मार्गस्थ झाला असून या ठिकाणी उत्सव मुर्तींना स्नान घालण्यात येते.
advertisement
5/9
दिवाळीतील या अमावस्येला भंडारा उडवत मोठ्या उत्साहाने भाविक जेजुरी गडावर येतात. आणि यळकोट यळकोट जय मल्हारचा गजर करतात.
advertisement
6/9
यळकोट यळकोट जय मल्हार या घोषणांनी भाविक मोठ्या आंनदाने ही अमावस्या साजरी करतात.
advertisement
7/9
जेजुरी गडावर सोमवती यात्रेला विशेष महत्त्व दिले जाते. दरवर्षी मोठ्या उत्साहात हा सोहळा संपन्न होतो.
advertisement
8/9
हिंदू धर्मांच्या परंपरेनुसार जेजुरीतील खंडोबाच्या गडावर सोमवती यात्रा साजरी केली जाते.
advertisement
9/9
या यात्रेत भविक मोठ्या संख्येने आणि भक्तीभावाने सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
सोन्याची जेजुरी... ‘सोमवती’साठी खंडोबा गडावर लाखोंची गर्दी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल