Weather Alert: 24 तास पावसाचे, पश्चिम महाराष्ट्रात धो धो कोसळणार, पुण्यासह या 3 जिल्ह्यांना हायअलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत असून पावसाचा जोर वाढला आहे. पुढील 24 तासांसाठी कोल्हापूर ते पुणे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
1/5

गणपती बाप्पांचे आगमन महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात झाले आहे. बाप्पांच्या आगमनाबरोबरच पावसाचा जोर कायम आहे. हवामान विभागाने आज राज्यातील बहुतांश जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट दिला आहे. पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाची तीव्रता कायम असून अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती खबरदारी घ्यावी लागेल.
advertisement
2/5
पुण्यात आज जोरदार पावसाची शक्यता असून संपूर्ण जिल्ह्यासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 28 ऑगस्ट रोजी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील काही दिवस हवामानाची हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.
advertisement
3/5
सातारा जिल्ह्यात कोणताही विशेष अलर्ट देण्यात आलेला नाही. मात्र सातारा घाट परिसरात हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्याच्या काही भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा अलर्ट पुढील 24 तासांसाठी देण्यात आला आहे.
advertisement
4/5
कोल्हापूर जिल्ह्याच्या घाट परिसरात जोरदार पावसाची शक्यता असून, या भागासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मात्र उर्वरित कोल्हापूर जिल्ह्यासाठी कोणताही विशेष अलर्ट देण्यात आलेला नाही. तरीही ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी बरसतील. पुढील काही काळात कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर आणखीन वाढण्याची शक्यता आहे.
advertisement
5/5
सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांसाठी आज कोणताही विशेष अलर्ट देण्यात आलेला नाही. मात्र हवामान खात्याने या भागात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुढील काही दिवस या जिल्ह्यांमध्ये अशीच हवामानस्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: 24 तास पावसाचे, पश्चिम महाराष्ट्रात धो धो कोसळणार, पुण्यासह या 3 जिल्ह्यांना हायअलर्ट