TRENDING:

Pune Rain: वारे वाहणार, मुसळधार पाऊस कोसळणार, पश्चिम महाराष्ट्रातील 3 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Last Updated:
आज दिनांक 13 जून रोजी दक्षिण मध्य महाराष्ट्रासह विदर्भात वादळी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रात हवामानाची स्थिती कशी राहील जाणून घेऊया.
advertisement
1/5
वारे वाहणार, पाऊस कोसळणार, पश्चिम महाराष्ट्रातील 3 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
राज्यभरात पुन्हा एखदा पावसाने जोरदार सेरुवात केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या विविध भागात ढगफूटी सदृश्य पाऊस झाला. आज दिनांक 13 जून रोजी दक्षिण मध्य महाराष्ट्रासह विदर्भात वादळी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रात हवामानाची स्थिती कशी राहील जाणून घेऊया.
advertisement
2/5
मागील 24 तासात कोल्हापूर परिसरात 6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. यावेळी 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वादळी वारे वाहतील. कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस वर असेल. जोरदार वादळी पावसाची शक्यता असल्याने भारतीय हवामान विभागाने दक्षतेचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.
advertisement
3/5
पुढील 24 तासात सांगली जिल्ह्यात प्रतितास 40 ते 50 किलोमीटर वेगवान वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज आहे. मागील 24 तासात 5 मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला. गडगडाटी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. यावेळी जिल्ह्यातील कमाल तापमान 32 तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस इतके राहील.
advertisement
4/5
साताऱ्यातील पारा 32 अंश सेल्सिअसवर राहिला. पुढील 24 तासात सातारा जिल्ह्यातील कमाल तापमान 32 अंशावर स्थिर राहिल. जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह प्रतितास 40-50 किलोमीटर वेगवान वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. पुढील 24 तासात सोलापूर जिल्ह्यातील कमाल तापमानात अंशतः घट होऊन पारा 26 अंशावर राहील. तसेच यलो अलर्टसह मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे.
advertisement
5/5
पुणे जिल्ह्यात मागील 24 तासात 31 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तसेच 5.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासात कमाल तापमान 29 अंशावर राहिल. जोरदार पावसाचा यलो अलर्ट भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. दिनांक 14 पासून विदर्भासह, छत्तीसगड आणि ओडिशा राज्यांच्या काही भागात मॉन्सूनची चाल होण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Pune Rain: वारे वाहणार, मुसळधार पाऊस कोसळणार, पश्चिम महाराष्ट्रातील 3 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल