TRENDING:

Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रात वारं फिरलं, 4 दिवस हवामानात मोठे बदल, IMD चा अलर्ट काय?

Last Updated:
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रातील थंडीचा जोर काही प्रमाणात ओसरण्याची शक्यता असून पुढील 4 दिवस हवामानात मोठे बदल जाणवतील. शुक्रवारचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
1/7
पश्चिम महाराष्ट्रात वारं फिरलं, 4 दिवस हवामानात मोठे बदल, IMD चा अलर्ट काय?
राज्यात थंडीची लाट कमी झाली असली, तरी सकाळच्या वेळी हुडहुडी कायम आहे. आकाश निरभ्र होत असून तापमानात चढ-उतार होत आहेत. पुढील तीन ते चार दिवस किमान तापमानातील वाढ कायम राहील. त्यानंतर पुन्हा गारठा वाढण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. आज 5 डिसेंबर रोजी पश्चिम महाराष्ट्रातील हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/7
पुणे जिल्ह्यात थंडीचा कडाका कमी होवून तापमानात वाढ जाणवत आहे. आज पुण्यातील कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस इतके राहील. पुढील चार दिवस किमान तापमान 12 ते 15 अंश दरम्यान राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
3/7
सातारा जिल्ह्यातील गारठा गायब झाला आहे. गरुवारी साताऱ्यातील कमाल तापमानाचा पारा 30 अंशावर तर 15.5 अंश सेल्सिअस किमान तापमान राहिले. आज सातारा जिल्ह्यात किमान आणि कमाल तापमान 17 ते 31 अंश सेल्सिअस दरम्यान राहील.
advertisement
4/7
कोल्हापूर जिल्ह्यातील किमान तापमानात वाढ होऊन पारा 20 अंशावर तर कमाल तापमान 30 अंशापर्यंत राहील. आज थंडी गायब होवून अंशतः ढगाळ आकाशाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
advertisement
5/7
गुरुवारी सोलापूर जिल्ह्यातील कमाल तापमान 31 अंश आणि किमान तापमान 18.6 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. आज तापमानाचा पारा चढता जाणवेल. कमाल तापमान 32 अंशावर तर किमान तापमान 16 अंशापर्यंत राहील. अंशत ढगाळ आकाशाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
advertisement
6/7
सांगली जिल्ह्यात मागील 24 तासात 17.7 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. आज जिल्ह्यात कमाल तापमान 31 अंशावर तर किमान तापमान 19 अंशावर राहील. पुढील 24 तास ढगाळ कशासह थंडीचा कडाका कमी होईल.
advertisement
7/7
शुक्रवारी राज्यातील थंडीचा जोर काही प्रमाणात कमी होऊन किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. मात्र पहाटे थंडी कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविला आहे. पुढील तीन ते चार दिवस किमान तापमानातील वाढ कायम राहील. त्यानंतर पुन्हा गारठा वाढण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रात वारं फिरलं, 4 दिवस हवामानात मोठे बदल, IMD चा अलर्ट काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल