TRENDING:

Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा बदलली हवा, पुणे ते कोल्हापूर नवा अलर्ट, आजचं अपडेट

Last Updated:
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल जाणवत आहेत. हवामान विभागाने नोव्हेंबरसाठी महत्त्वाचा इशारा दिला आहे.
advertisement
1/7
पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा बदलली हवा, पुणे ते कोल्हापूर नवा अलर्ट, आजचं अपडेट
उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह कमी झाल्याने राज्यात थंडी गायब झाली असून हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. राज्यात ढगाळ आकाश असून काही ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज 25 नोव्हेंबर रोजी कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हानिहाय हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/7
पुणे जिल्ह्यात थंडीचा जोर कमी झाला असून सोमवारी 31.3 कमाल आणि 17.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाचा पारा नोंदविण्यात आला. आज कमाल तापमान 32 अंशापर्यंत राहील. तर किमान तापमान 16 अंशांवर राहील.
advertisement
3/7
साताऱ्यातील गारठा काहीसा कमी झाला आहे. सोमवारी साताऱ्यातील कमाल तापमानाचा पारा 31.8 अंशावर तर किमान 16.8 अंश सेल्सिअसवर राहिला. आज सातारा जिल्ह्यात किमान आणि कमाल तापमान 18 ते 33 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. त्यामुळे थंडी कमी राहणार असून हवामान काहीसे ढगाळ राहील.
advertisement
4/7
कोल्हापूर जिल्ह्यात वातावरणातील थंडी गायब होवून कमाल तापमानाचा पारा 30 अंशावर राहील. तसेच किमान तापमानाचा पारा 20 अंशापर्यंत राहील. आज गारठा कमी राहून विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
advertisement
5/7
सोलापूर जिल्ह्यात सोमवारी कमाल तापमान 31.2 अंश तर किमान तापमान 20.5 अंशावर राहिले. आज कमाल तापमानाचा पारा 34 अंशावर राहील. तसेच किमान तापमानाचा पारा 21 अंशापर्यंत राहील.
advertisement
6/7
सांगली जिल्ह्यात मागील 24 तासात 19.6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. आज जिल्ह्यात कमाल तापमान 32.1 अंश तर किमान तापमान 18 अंशावर राहील. आकाश ढगाळ अंशतः राहील. जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
advertisement
7/7
सध्या दक्षिण भारतासह, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात पावसाला पोषक हवामान झाले असून आकाश ढगाळ आहे. आज 25 नोव्हेंबर रोजी राज्यात गारठा कमी होणार असून ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत ढगाळ आकाश, विजांसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा बदलली हवा, पुणे ते कोल्हापूर नवा अलर्ट, आजचं अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल