TRENDING:

Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रात वारं फिरलं, थंडी नव्हे आता नवं संकट, IMD कडून पावसाचा अलर्ट

Last Updated:
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. थंडीची लाट ओसरून पुढील काही दिवस अवकाळी पावसाचं संकट येण्याची शक्यता आहे.
advertisement
1/7
पश्चिम महाराष्ट्रात वारं फिरलं, थंडी नव्हे आता नवं संकट, IMD कडून पावसाचा अलर्ट
उत्तरेकडील शीत वाऱ्यांमुळे उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट कायम आहे. तर दक्षिण मध्य माहाराष्ट्रात पुन्हा अवकाळी संकटाचा धोका वाढला आहे. या कोल्हापूर, सांगली, सातारा भआगात अंशत: ढगाळ आकाशासह पावसाला पोषक हवामान होत आहे. आज 21 नोव्हेंबर रोजी थंडीची लाट काहीशी ओसणार असली तरी, गारठा कायम राहण्याचा अंदाज आहे. पश्चिम महाराष्ट्रातील हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/7
पुणे जिल्ह्यातील थंडीचा कडाका अंशत: कमी झाला असून गुरुवारी 29.7 कमाल आणि 11 अंश सेल्सिअस किमान तापमानाचा पारा नोंदविण्यात आला. आज पुणे जिल्ह्यातील कमाल तापमानात अंशत: वाढ होऊन ते 31 अंशापर्यंत राहील. तसेच किमान तापमानाचा पारा 12 अंश सेल्सिअस राहील.
advertisement
3/7
साताऱ्यातील गारठा काहीसा कमी झाला आहे. गुरुवारी साताऱ्यातील कमाल तापमानाचा पारा 31.7 अंशावर राहिला. तर 13 अंश सेल्सिअस किमान तापमान राहिले. आज सातारा जिल्ह्यात किमान आणि कमाल तापमान 15 ते 31 अंश सेल्सिअस दरम्यान राहील.
advertisement
4/7
कोल्हापूरमध्ये दिवसाची सुरुवात साधारण 17.3 अंश सेल्सिअसच्या किमान तापमानाने होवून, जसजसा दिवस पुढे जाईल तसतसे कमाल तापमान 32 अंश सेल्सिअसवर जाण्याची शक्यता आहे. शनिवारी ढगाळ वातावरणासह गडगडाटी पावसाची शक्यता असल्याने वातावरणातील गारठा कमी जाणवत आहे.
advertisement
5/7
सोलापूर जिल्ह्यात गुरुवारी कमाल तापमान 32.1 अंश सेल्सिअसवर तर किमान तापमान 15.4 अंशावर राहिले. आज कमाल तापमानाचा पारा 34 अंशावर राहील. तसेच किमान तापमानाचा पारा 18 अंशापर्यंत राहील.
advertisement
6/7
सांगली जिल्ह्यात मागील 24 तासात 15.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. आज जिल्ह्यात कमाल तापमान 32 अंशावर राहील. तसेच किमान तापमान 18 अंशावर राहील. सांगलीत अंशत: ढगाळ हवामानाच्या चाहूलीने थंडीचा कडाका कमी झाला आहे.
advertisement
7/7
लक्षद्वीप बेटे आणि मालदीव परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रीय असून, त्याला लागून समुद्र सपाटीपासून 4.5 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. यातच आग्नेय बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली असून, या प्रणालीची तीव्रता वाढणार आहे. या प्रणालींमुळे दक्षिण भारतात पावसाचा जोर वाढणार आहे. तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रात वारं फिरलं, थंडी नव्हे आता नवं संकट, IMD कडून पावसाचा अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल