Weather Alert: शनिवारी पावसाचा धुमाकूळ, 11 जिल्ह्यांना झोडपणार, हवामान विभागाकडून 24 तासांसाठी अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
Weather Alert: राज्यातील हवामानात मोठे बदल जाणवत असून काही भागात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. पुढील 24 तासांसाठी 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
1/7

राज्यातील काही भागात पावसाचा जोर वाढला असून 19 जुलै रोजी महाराष्ट्रातील अनेक भागांत ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि हलका ते मध्यम पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 24 तासांसाठी 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केल आहे.
advertisement
2/7
कोकण विभागातील पालघर, ठाणे, आणि मुंबईमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पाऊस होण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्गमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे व पुणे घाटमाथ्यावर हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, कोल्हापूर घाटमाथा, सातारा, सातारा घाटमाथा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये विजा आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे आणि पुणे घाटमाथा परिसर वगळता इतर सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.
advertisement
4/7
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. तर लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये विजा व वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
5/7
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक घाटमाथा आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
advertisement
6/7
विदर्भातील अकोला आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये वीजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पावसाची कुठलीही शक्यता नाही.
advertisement
7/7
राज्यातील ज्या भागांमध्ये विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांचा इशारा आहे, तेथील नागरिकांनी आवश्यक नसल्यास घराबाहेर पडणे टाळावे. बाहेर असताना सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. विजेच्या उपकरणांपासून दूर राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: शनिवारी पावसाचा धुमाकूळ, 11 जिल्ह्यांना झोडपणार, हवामान विभागाकडून 24 तासांसाठी अलर्ट