TRENDING:

Weather Alert: बाप्पाच्या आगमनाआधीच मुसळधार, पश्चिम महाराष्ट्रातील 3 जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
गणपती बाप्पाच्या आगमनाबरोबर विश्रांती घेतलेला पावसाने पुन्हा दमदारपणे हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. आजही हवामान खात्याने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
advertisement
1/5
बाप्पाच्या आगमनाआधीच मुसळधार, पश्चिम महाराष्ट्रातील 3 जिल्ह्यांना अलर्ट
महाराष्ट्रात श्रावणअखेर पावसाचा जोर काहीसा ओसरला होता. परंतु, गणपती बाप्पाच्या आगमनाआधीच विश्रांती घेतलेला पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. आज, 26 ऑगस्ट रोजी हवामान विभागाने पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुणे, कोल्हापूरसह 5 जिल्ह्यांतील हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/5
पुण्यात आज विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुढील काही दिवस घाटभागात पावसाचा जोर कायम राहणार आहे. या भागाला हवामान विभागाने 4 दिवसांसाठी अलर्ट जारी केला आहे. मात्र उर्वरित पुणे जिल्ह्यात पावसाचा कोणताही महत्त्वाचा अलर्ट देण्यात आलेला नाही.
advertisement
3/5
गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे साताऱ्यातील सर्व धरणांची पाणीपातळी वाढली आहे. आता पुन्हा एकदा सातारा जिल्ह्यात, विशेषत: घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर सातारा जिल्ह्यात देखील हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
4/5
कोल्हापूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. घाटमाथ्यावर अधिक पाऊस पडू शकतो. हवामान विभागाने या भागात यलो अलर्ट जारी केला आहे. तर कोल्हापूरसह जिल्हाभरात हलक्या ते मध्यम सरी बरसतील. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असा सल्ला हवामान खात्याने दिला आहे.
advertisement
5/5
सोलापूर आणि सांगली जिल्ह्यास पुढील काही दिवस जोरदार पावसाचा कोणताही अलर्ट देण्यात आला नाही. मात्र याठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत गणेशोत्सव काळात पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे गणेशभक्तांनी हवामान अंदाज पाहूनच पुढील नियोजन करावे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: बाप्पाच्या आगमनाआधीच मुसळधार, पश्चिम महाराष्ट्रातील 3 जिल्ह्यांना अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल