TRENDING:

Weather Alert: काळे ढग दाटणार, धो धो कोसळणार, कोल्हापूर ते पुणे ऑरेंज अलर्ट, आजचा हवामान अंदाज

Last Updated:
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रातील घाट भागात जोरदार पाऊस सुरू आहे. आज पुन्हा 3 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.
advertisement
1/7
काळे ढग दाटणार, धो धो कोसळणार, कोल्हापूर ते पुणे ऑरेंज अलर्ट, आजचा हवामान अंदाज
कोकण, घाटमाथ्यावर संततधार पाऊस कोसळत आहे. पुढील 48 तासात घाटमाथ्यावरील पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्राच्या घाटाकडील भागात पावसाची तीव्रता कायम आहे. आज 3 जुलै रोजी घाट माथ्यावरील परिसरात जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.
advertisement
2/7
कोल्हापूर परिसरात 12 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासात कोल्हापूर घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट कायम आहे. तसेच उर्वरित जिल्ह्यात ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची शक्यता आहे. यावेळी कमाल तापमान 27 अंश सेल्सिअसवर राहिल.
advertisement
3/7
सातारा परिसरात गेल्या 24 तासात 3 मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला. कमाल तापमान 26.3 अंश सेल्सिअस राहिले. पुढील 24 तासात कमाल तापमान 27 अंशावर राहील. ढगाळ आकाशासह हलक्या पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
advertisement
4/7
गेल्या 24 तासात पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर परिसरात 5.9 मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला. आज हवामान विभागाने मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच कमाल तापमान 28 अंशावर जाण्याचा अंदाज आहे. पुणे घाटमाथ्यावर जोरदार पावचसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.
advertisement
5/7
सांगली जिल्ह्यात 1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासात सांगली जिल्ह्यात ढगाळ आकाशासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. यावेळी जिल्ह्यातील कमाल तापमान 28 तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतके राहील.
advertisement
6/7
राज्यभरामध्ये पावसाचा जोर वाढत असताना पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात मात्र पारा तापला आहे. मागील 24 तासात जळगावसह सोलापूर जिल्ह्यात राज्यातील उच्च 32 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मागील 24 तासात 1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासात हलक्या पावसाची शक्यता आहे. यावेळी पारा 31 अंशांवर राहील.
advertisement
7/7
पश्चिम महाराष्ट्रातील घाट भाग वगळता इतर ठिकाणी तुरळक हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने आज कोणताही सतर्कतेचा अलर्ट दिलेला नाही. पुढील काही काळ हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. घाटभागात मात्र पावसाचा जोर असल्याने शेतकऱ्यांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: काळे ढग दाटणार, धो धो कोसळणार, कोल्हापूर ते पुणे ऑरेंज अलर्ट, आजचा हवामान अंदाज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल