Weather Alert : राज्यात पुढील 24 तास पावसाचे, 7 जिल्ह्यांना रेड अलर्ट, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
पुढील 24 तासांसाठी देखील राज्यातील ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे आणि साताऱ्याचा घाट परिसर आणि सातारा जिल्ह्याला हवामान विभागाने रेड अलर्ट जाहीर केला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
advertisement
1/7

नैऋत्य मान्सूनने आता मुंबई धडक घेतली आहे. 26 मे रोजी मुंबईमध्ये मान्सून दाखल झाल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. तर मागील 24 तासांमध्ये राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, कल्याण, पालघर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीच्या समस्या निर्माण झाल्या.
advertisement
2/7
पुढील 24 तासांसाठी देखील राज्यातील ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे आणि साताऱ्याचा घाट परिसर आणि सातारा जिल्ह्याला हवामान विभागाने रेड अलर्ट जाहीर केला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पुढील 24 तास राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी महत्त्वाचे असणार आहेत. पाहुयात 27 मे रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी असेल.
advertisement
3/7
मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर कोकण विभागातील रत्नागिरी, सिंधुदुर्गला रेड अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
4/7
याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाचे धुमशान पाहायला मिळणार आहे. सकाळी आठ वाजेपर्यंत पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि साताऱ्याचा घाट परिसर आणि सातारा जिल्ह्याला अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
5/7
तर पुणे जिल्ह्याचा उर्वरित भाग, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. नाशिक आणि नाशिकचा घाट परिसर यामध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर जळगाव, धुळे आणि नंदुरबार मध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मराठवाड्यातही संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता.
advertisement
6/7
मराठवाड्यातील बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना 27 मे रोजीसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. विदर्भामध्ये देखील पावसाचा जोर पाहायला मिळणार असून गडचिरोलीमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
advertisement
7/7
तर विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम, अकोला, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबई आणि आसपासचे जिल्हे, तळ कोकणातील जिल्हे तसेच सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यांना अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert : राज्यात पुढील 24 तास पावसाचे, 7 जिल्ह्यांना रेड अलर्ट, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?