TRENDING:

Weather Alert : राज्यात मंगळवारी तुफान आलंया, 26 जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. पाहुयात 2 सप्टेंबर रोजी राज्यामध्ये हवामानाची स्थिती कशी असेल.
advertisement
1/7
राज्यात मंगळवारी तुफान आलंया, 26 जिल्ह्यांना अलर्ट
2 सप्टेंबर रोजी दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.
advertisement
2/7
पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. पाहुयात 2 सप्टेंबर रोजी राज्यामध्ये हवामानाची स्थिती कशी असेल.
advertisement
3/7
मुंबई शहर आणि उपनगरात पुढील 24 तासात ढगाळ आकाशासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार तर कुठे मुसळधार पावसाची शक्यता आहे.
advertisement
4/7
पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाट भागावर मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
advertisement
5/7
नाशिक आणि नाशिकचा घाट परिसर, नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. अहिल्यानगरमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
advertisement
6/7
मराठवाड्यातील सर्व आठही जिल्ह्यांना हवामान विभागाने 2 सप्टेंबर रोजीसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
advertisement
7/7
विदर्भातील गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, तर उर्वरित सर्व 9 जिल्ह्यांना देखील हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. पूर्व विदर्भात पावसाची तीव्रता अधिक राहणार असून काही ठिकाणी मुसळधार तर कुठे कुठे अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert : राज्यात मंगळवारी तुफान आलंया, 26 जिल्ह्यांना अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल