Weather Alert: 1 जुलै रोजी राज्यात मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
आता जुलै महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 1 जुलै रोजी पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा परिसर, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
advertisement
1/7

संपूर्ण जून महिन्यात राज्यातील विविध भागांत पावसाची विचित्र स्थिती आपण बघितली. काही भागांत मुसळधार पाऊस झालाय तर काही भागांत खूप कमी पाऊस झालाय. यामुळे शेतकऱ्यांची चिंता देखील वाढीस लागली होती. आता जुलै महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 1 जुलै रोजी पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा परिसर, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे. पाहुयात पुढील 24 तासांत राज्यातील हवामानाची स्थिती कशी राहील.
advertisement
2/7
1 जुलै रोजी मुंबईत मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मुंबईसह पालघर, ठाणे या जिल्ह्यांतही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्यानं पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
3/7
पुण्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा आणि सातारा घाटमाथा या तिन्ही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. इतर उर्वरित जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
advertisement
4/7
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या सर्व जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. या सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यातील इतर उर्वरित जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
advertisement
5/7
उत्तर महाराष्ट्रातील नाशिकसह धुळे, नंदुरबार, जळगाव या तिन्ही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
6/7
विदर्भातील नागपूरसह अमरावती, भंडारा या जिल्ह्यांतही वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. इतर उर्वरित जिल्ह्यांत कुठलीही पावसाची शक्यता नाही.
advertisement
7/7
राज्यातील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडताना काळजी घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी सुद्धा पिकांची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: 1 जुलै रोजी राज्यात मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट