Weather Alret : महाराष्ट्र आता बर्फासारखा गार होणार, हवामान खात्याचा अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत असून तापमानात चढउतार पहायला मिळत आहे. पाहुयात राज्यात 17 डिसेंबर रोजी हवामानाची स्थिती कशी असेल.
advertisement
1/7

राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत असून तापमानात चढउतार पहायला मिळत आहे. मुंबईत किमान तापमानात वाढ झाली आहे. तर पुणे शहरात 9 अंश सेल्सिअस एवढे तापमान नोंदवले गेले. विदर्भ मराठवाड्यात गारठा किंचित कमी झाला आहे. विशेष म्हणजे 17 डिसेंबरला राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला कोल्ड वेव्हचा इशारा देण्यात आलेला नाही. त्यामुळे ही दिलासादायक बातमी आहे. पाहुयात राज्यात 17 डिसेंबर रोजी हवामानाची स्थिती कशी असेल.
advertisement
2/7
मुंबईसह कोकणात किमान तापमानात वाढ झाल्याने गारठा कमी झाला आहे. परंतु या वातावरणात पुन्हा बदल संभवतात. मुंबई किमान तापमान 19 तर कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस राहील.
advertisement
3/7
पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा कडाका कायम आहे. कोल्ड वेव्हचा इशारा देण्यात आलेला नसला तरी किमान तापमान 9 अंश सेल्सिअस इतके राहील. कोल्हापूरमध्ये किमान तापमान 16 अंश सेल्सिअस इतके असेल.
advertisement
4/7
उत्तर महाराष्ट्रातील गारठा कमी झाला आहे. इथे अगदी 7 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान नोंदवले गेले होते. 17 डिसेंबर रोजी नाशिकमध्ये 11 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान राहील.
advertisement
5/7
छत्रपती संभाजीनगरसह मराठवाडा निरभ्र आकाश आणि कोरडे हवामान पहायला मिळेल. तर गारठा कायम राहील. छत्रपती संभाजीनगर शहरात किमान तापमान 11 अंश सेल्सिअस एवढे असेल.
advertisement
6/7
विदर्भात कमी झालेली थंडी पुन्हा परतली आहे. नागपूरसह विदर्भातील बहुतांश भागात गारठा वाढला आहे. नागपूर शहरात 17 डिसेंबर रोजी 9 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान राहील.
advertisement
7/7
एकंदरीत, राज्यातील नागरिकांना वाढलेल्या थंडीपासून काहीसा दिलासा मिळणार आहे. मात्र किमान तापमानातील घट किंचित असल्याने गारवा कायम राहणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alret : महाराष्ट्र आता बर्फासारखा गार होणार, हवामान खात्याचा अलर्ट