IPL 2026 : धोनीच्या CSKने GEN Z खेळाडूंची टीम बनवली, कुणा कुणाला घेतलं ताफ्यात?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
अबुधाबीमध्ये आयपीएल 2026 चा मिनी लिलाव पार पडला आहे. या लिलावानंतर आता सर्व संघाची संपूर्ण लिस्ट समोर यायला सूरूवात झाली आहे.
advertisement
1/7

अबुधाबीमध्ये आयपीएल 2026 चा मिनी लिलाव पार पडला आहे. या लिलावानंतर आता सर्व संघाची संपूर्ण लिस्ट समोर यायला सूरूवात झाली आहे. या दरम्यान महेंद्र सिंह धोनी असलेल्या चेन्नई सुपर किंग्जची टीम कशी आहे? हे जाणून घेऊयात.
advertisement
2/7
आजच्या लिलावात चेन्नई सुपर किंग्जने अनेक युवा खेळाडूंना खरेदी केले होते.त्यात प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा महागडे खेळाडू होते. या दोघांना प्रत्येकी 14.28 रूपयांना खरेदी केले होते.
advertisement
3/7
दरम्यान या दोन अनकॅप खेळाडूनंतर चेन्नई सुपर किंग्ज काही अनुभवी खेळाडूंना संधी देईल असे वाटत होते. पण त्यांनी सरफराज खान आणि अमन खान सारख्या खेळाडूंना शेवटी शेवटी घेतले.
advertisement
4/7
विशेष म्हणजे चेन्नईकडे आधीच खूप युवा खेळाडू आहेत. ज्यांना त्यांनी रिटेनही केले होते. यामध्ये आयु्ष म्हात्रे, डेवाल्ड ब्रेविस, युर्विल पटेल, रामकृष्णा घोष या खेळाडूंचा समावेश होतो.
advertisement
5/7
चेन्नईने झाकरी फोल्कस, मॅट हेन्ररी या न्यूझीलंडच्या खेळाडूंना ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू शॉटला आणि वेस्ट इंडिजच्या अकिल होसेनला संघात घेतलं आहे. पण हे खेळाडू फारसे नावाजलेले नाहीयेत.
advertisement
6/7
चेन्नईने राहुल चहरला संघात स्थान दिले आहे. राहुल चहर देशांतर्गत क्रिकेटमध्ये फारशी कामगिरी करू शकलेला नाही आहे. पण त्याच्या जोडीला संघात अंशुल कंबोज, खलील अहमद,शिवम दुबे सारखे गोलंदाज आहेत.
advertisement
7/7
चेन्नईचा संघ : कार्तिक शर्मा, प्रशांत वीर, अकेल होसेन, एमएस धोनी, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, आयुष म्हात्रे, डेवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, उर्विल पटेल, नूर अहमद, नॅथन एलिस, श्रेयस गोपाल, खलील अहमद, रामकृष्ण घोष, मुकेश चौधरी, जेमी ओवरटन, गुरजनप्रीत सिंह,अंशुल कंबोज
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IPL 2026 : धोनीच्या CSKने GEN Z खेळाडूंची टीम बनवली, कुणा कुणाला घेतलं ताफ्यात?