Weather Alert : महाराष्ट्रातील जिल्ह्यांसाठी पुढील 24 तास धोक्याचे! विजा कडाडणार, पाऊस कोसळणार!
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
वातावरणातील दमटपणाही वाढला आहे. 9 ऑक्टोबर रोजी राज्यामध्ये हवामानाची स्थिती कशी असेल.
advertisement
1/7

राज्यातील दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह आणि ताशी 30 ते 40 किमी वेगाने वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेने वर्तवली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून उष्णता वाढण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील बहुतेक शहरांमधील तापमान हे 35 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. त्याचबरोबर वातावरणातील दमटपणाही वाढला आहे. 9 ऑक्टोबर रोजी राज्यामध्ये हवामानाची स्थिती कशी असेल.
advertisement
2/7
मुंबई शहर आणि उपनगरात साधारणपणे ढगाळ आकाश राहील, तर अधूनमधून हलक्या पावसाची शक्यता आहे. मुंबईतील कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 27 34 अंश सेल्सिअस आसपास असेल. तर दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रातही वादळी वाऱ्यांसह आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर दुपारच्या वेळी कमाल तापमानात वाढ होण्याची देखील शक्यता आहे.
advertisement
4/7
उत्तर महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्याला हवामान विभागाने पावसासाठी इशारा दिलेला नाही. पावसाने राज्यातून विश्रांती घेतली असून उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्येही उघडीप पाहायला मिळत आहे.
advertisement
5/7
मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्येही पावसाची कुठलीही शक्यता नाही. दक्षिण मराठवाड्यातील काही जिल्हे वगळता मराठवाड्यातील सर्व आठ जिल्ह्यांमध्ये स्वच्छ सूर्यप्रकाश राहण्याची शक्यता आहे, तर कमाल तापमान 30 ते 35 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील.
advertisement
6/7
पूर्व विदर्भात मागील काही दिवसांत जोरदार पाऊस झाल्याचे पाहायला मिळाले. गडचिरोली, भंडारा या जिल्ह्यांमध्ये पावसामुळे पूरस्थिती देखील उद्भवली. परंतु आता विदर्भातील कमाल तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली असून ऑक्टोबर हीट देखील जाणवण्यास सुरुवात झाली आहे. कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत असल्याने नागरिकांना उष्णतेचा त्रास होत आहे.
advertisement
7/7
दरम्यान, नैऋत्य मान्सून हा आता परतीच्या वाटेवर असून महाराष्ट्राच्या अनेक भागातून मान्सूनने काढता पाय घेतला आहे. परंतु संपूर्ण राज्यातून मान्सून मागे फिरलेला नाही. येत्या काही दिवसांमध्ये मान्सून राज्यामधून माघारी फिरेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert : महाराष्ट्रातील जिल्ह्यांसाठी पुढील 24 तास धोक्याचे! विजा कडाडणार, पाऊस कोसळणार!