TRENDING:

Weather Alert : राज्यात पुढील काही दिवस पावसाचे, 2 जिल्ह्यांना रेड अलर्ट, पाहा हवामानाचा अंदाज

Last Updated:
रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
advertisement
1/7
राज्यात पुढील काही दिवस पावसाचे, 2 जिल्ह्यांना रेड अलर्ट, पाहा हवामानाचा अंदाज
राज्यात दिवसेंदिवस मान्सूनपूर्व पावसाचा जोर वाढतच चालला आहे. याआधी राज्यातील विविध भागांत पावसाचा यलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात येत होता. अशातच आता 23 मेसाठी हवामान विभागाने दोन जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट सुद्धा जारी केला आहे.
advertisement
2/7
सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे भरपूर नुकसान होत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस पावसाचा जोर असाच कायम राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढण्याची शक्यता आहे.
advertisement
3/7
मुंबईत सामान्यतः ढगाळ आकाश राहून जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 23 मे रोजी तेथील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 22 अंश सेल्सिअस इतके राहण्याची शक्यता आहे. पुण्यातही ढगाळ वातावरणासह जोरदार पावसाचा अंदाज आहे. तेथील तापमान 21 ते 33 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
advertisement
4/7
छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये अंशतः ढगाळ आकाश असून वादळी वाऱ्यांसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दोन्ही ठिकाणी कमाल तापमान अनुक्रमे 33 आणि 32 अंश सेल्सिअस इतके राहू शकते.
advertisement
5/7
नागपूरमध्ये वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तेथील तापमान 25 ते 37 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. राज्यातील पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक, अहिल्या नगर, पुणे, छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
6/7
रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर धुळे, नंदुरबार, जळगाव, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना 23 मे साठी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
7/7
हवामान खात्याने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांनीही त्यांच्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. राज्यात वातावरण ढगाळ आणि पावसाळी राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक महत्वाचे आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert : राज्यात पुढील काही दिवस पावसाचे, 2 जिल्ह्यांना रेड अलर्ट, पाहा हवामानाचा अंदाज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल