Mumbai Pune Expressway: फिरायला जाताय? जरा थांबा! मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर 'ब्रेक', लोणावळा घाटात वाहनांच्या रांगा
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
विकेंडच्या गर्दीमुळे महामार्गावर वाहनांची संख्या प्रचंड वाढली असून, प्रवासाचा वेग कमालीचा मंदावला आहे. वाहतुकीची ही गुंतागुंत सोडवण्यासाठी महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
advertisement
1/7

शनिवार आणि रविवारच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी घराबाहेर पाऊल टाकल्याने मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर आज सकाळपासूनच मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.
advertisement
2/7
विकेंडच्या गर्दीमुळे महामार्गावर वाहनांची संख्या प्रचंड वाढली असून, प्रवासाचा वेग कमालीचा मंदावला आहे.
advertisement
3/7
ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर सलग सुट्ट्यांचे नियोजन करून नागरिक लोणावळा, खंडाळा आणि महाबळेश्वर यांसारख्या पर्यटन स्थळांकडे निघाले आहेत. यामुळे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
advertisement
4/7
विशेषतः बोरघाट आणि लोणावळा परिसरात वाहने संथ गतीने पुढे सरकत असून, काही ठिकाणी तर वाहनं बराच वेळ एकाच जागी उभी असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
advertisement
5/7
केवळ मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणारीच नाही, तर पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूकही विस्कळीत झाली आहे. दोन्ही लेनवर वाहनांचा भार वाढल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
advertisement
6/7
वाहतुकीची ही गुंतागुंत सोडवण्यासाठी महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.
advertisement
7/7
महत्त्वाच्या वळणांवर आणि घाटात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, वाहनचालकांनी शिस्त पाळावी आणि संयम ठेवावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Mumbai Pune Expressway: फिरायला जाताय? जरा थांबा! मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर 'ब्रेक', लोणावळा घाटात वाहनांच्या रांगा