Pune Rain: पुण्यात पावसाचा धुमाकूळ, मार्केट यार्डातील फळे, भाजीपाला गेला वाहून, रस्त्यांना नदीचं रूप, PHOTO
- Reported by:Prachi Balu Kedari
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Pune Rain: पुण्यात मंगळवारी दुपारी पावसाने कहर केला. मुसळधार पावसामुळे मार्केट यार्ड जलमय झाला असून शेतकऱ्यांचा भाजीपाला वाहून गेला आहे.
advertisement
1/5

पुणे शहरात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. मंगळवारी दुपारी तुफान पाऊस झाल्यामुळे मार्केट यार्ड परिसरात पाणीच पाणी झाले असून शेतकऱ्यांचा भाजीपाला व फळे रस्त्यावर वाहून गेल्याचे चित्र दिसून आले.
advertisement
2/5
पुणे शहरात शनिवारपासून पावसाने जोरदार सुरुवात केली. शहरासह वाघोली, थेऊर आणि लोणी या उपनगरांमध्ये पावसाने मोठा कहर केला. अनेक घरांमध्ये पाणी शिरले, तर वाहनधारकांना देखील त्रास सहन करावा लागला. सोमवारी रात्री उशिरा पावसाने थोडी विश्रांती घेतली होती.
advertisement
3/5
मंगळवारी दुपारनंतर पावसाचा जोर पुन्हा वाढला. पुण्यातील सर्वात मोठे भाजी व फळांचे मार्केट म्हणून ओळखले जाणारे गुलटेकडी येथील मार्केट यार्ड या पावसामुळे अक्षरशः पाण्याखाली गेले आहे. मार्केटमधील रस्त्यांना नदीचे रुप आले असून येथे आलेल्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
advertisement
4/5
ट्रक व गाड्यांमधून उतरवलेला भाजीपाला पाण्यात वाहून गेला. कांदा, टोमॅटो, भेंडी, वांगी, मिरची यांसारख्या भाज्यांसह द्राक्षे, पेरू, डाळिंब यांसारखी फळेही पाण्यात भिजल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकरी आणि व्यापारी या दोघांनाही मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.
advertisement
5/5
पुणेकरा नागरिकांना कामासाठी बाहेर पडणे कठीण झाले असून अनेक भागांत वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तसेच पाण्याचा अंदाज घेऊन सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन केले आहे. तसेच हवामान विभागाने पुढील काही तासांमध्येही जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Pune Rain: पुण्यात पावसाचा धुमाकूळ, मार्केट यार्डातील फळे, भाजीपाला गेला वाहून, रस्त्यांना नदीचं रूप, PHOTO