युट्युबवर बघून शिकली कला; कसा बनला सिद्धार्थ महाराष्ट्राचा स्टॅच्यू मॅन? पाहा PHOTOS
- Published by:News18 Marathi
Last Updated:
स्टॅच्यू मॅन ही मुळची अमेरिकन कला असून मराठमोळा सिद्धार्थ ती सादर करत आहे.
advertisement
1/6

आतापर्यंत आपण विविध भारतीय कला सादर करणारे कलाकार पाहिले असतील. पण, अमेरिकन स्टॅच्यू मॅनच्या कलेत माहीर असणारा मराठमोळा तरुण माहितीये का?<a href="https://news18marathi.com/pune/"> पुण्यातील</a> कलाकार कट्टा इथे स्टॅचू मॅनची कला सादर करणाऱ्या सद्धार्थ पिटेकरची महाराष्ट्राचा स्टॅच्यू मॅन अशीच ओळख निर्माण झालीय. सिद्धार्थ हा मुळचा अहमदनगर जिल्ह्यातील असून त्याने युट्युबवर बघून ही कला आत्मसात केल्याचे सांगितले.
advertisement
2/6
स्टॅच्यू मॅन ही मुळची अमेरिकन कला आहे. पुतळ्या सारखं एका जागेवर स्थिर उभ राहणं याला स्टॅचू मॅन कला म्हणतात. सिद्धार्थला लहानपणापासूनच कलेच्या क्षेत्रात जायचं होतं. त्यातच त्याला स्टॅच्यू मॅन कलेबाबत माहिती मिळाली आणि तो या क्षेत्राकडे वळला, असं सिद्धार्थ सांगतो.
advertisement
3/6
माझी आताच बारावी झाली आणि माझी ओळख महाराष्ट्रात स्टॅचू मॅन म्हणून आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये यूट्यूबवर असंच व्हिडिओ पाहत असताना स्टॅचू मॅन ही विदेशी कला पाहायला मिळाली. तेव्हा वाटलं की आपण हे करू शकतो.
advertisement
4/6
कारण लहानपणा पासूनच व्यायामाची आवड होती. फिटनेस ही चांगला होता. त्यामुळे स्टॅच्यू मॅन कलेची प्रॅक्टीस सुरू केली. 15 ऑगस्टला ही कला प्रथम नेवासे येथे सादर केली आणि याला चांगला प्रतिसाद मिळाला. 8 ते 5 असा शो केला. घरच्यांना ही माहिती जेव्हा बक्षीस घेऊन गेलो तेव्हा समजली, असं सिद्धार्थनं सांगितलं.
advertisement
5/6
कला सादर करताना अनेक अडचणी आल्या. हातपाय थरथर कापायचे. उभ राहता येत नव्हतं. परंतु काही करून करायचं होतं. तसा फिटनेस होता. त्यानंतर 15 ऑगस्टच्या दिवशी पहिल्यांदा ही कला सादर केली. सगळ्यांनी कौतुकही केलं.
advertisement
6/6
आता पुण्यातील गुडलक चौक येथे ही स्टॅचू मॅन ची कला 4 ते रात्री 9 वेळात सादर करत असतो. कौतुक म्हणून काही लोक येऊन भेटतात व नंतर कॉल ही करतात. छान वाटतं, अशी माहिती स्टॅचू मॅन सादर करणारा सिद्धार्थ पिटेकरनं सांगितली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
युट्युबवर बघून शिकली कला; कसा बनला सिद्धार्थ महाराष्ट्राचा स्टॅच्यू मॅन? पाहा PHOTOS