Pune Rain Alert: पुढील 24 तास मुसळधार पावसाचे, पुणे आणि साताऱ्याला अलर्ट, पाहा हवामानाचा अंदाज
- Published by:Mohan Najan
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
राज्यात पावसाचा जोर कमी होणार असला तरी पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. पाहुयात पश्चिम महाराष्ट्रातील हवामान कसे असेल.
advertisement
1/7

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत पावसाचा जोर कमी झाला आहे. आज दिनांक 23 रोजी कोकण, घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरीसह पुण्याच्या घाटमाथ्यावर दक्षतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
2/7
उर्वरित राज्यात पावसाचा जोर कमी होणार असला तरी पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. पाहुयात पश्चिम महाराष्ट्रातील हवामान कसे असेल.
advertisement
3/7
मागील 24 तासांमध्ये सातारा शहरात 7 मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला. यावेळी कमाल तापमान 27.8 अंश सेल्सिअस राहिले. पुढील 24 तासात कमाल तापमान 29 अंशावर राहील. ढगाळ आकाशासह हलक्या पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे. सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
advertisement
4/7
पुणे जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार कमी झाली आहे. मागील 24 तासात शिवाजीनगर परिसरात 3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तसेच 29.6 अंश सेल्सिअस कमाल तापमान राहिले. पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. मागील 24 तासात कोल्हापूर परिसरात 5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासात कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस वर असेल. हलक्या पावसासह आकाश साधारणपणे ढगाळ राहील.
advertisement
5/7
सोलापूर जिल्ह्यातील कमाल तापमानात वाढ झाली असून मागील 24 तासात पारा 34.3 अंशावर राहिला. पुढील 24 तासात आकाश साधारणपणे ढगाळ राहून रिमझिम पावसाची शक्यता आहे. यावेळी कमाल तापमान 33 अंशांवर स्थिर राहिल.
advertisement
6/7
मागील 24 तासात सांगली जिल्ह्यात 0.1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासात सांगली जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे.
advertisement
7/7
यावेळी जिल्ह्यातील कमाल तापमान 29 तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतके राहील. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Pune Rain Alert: पुढील 24 तास मुसळधार पावसाचे, पुणे आणि साताऱ्याला अलर्ट, पाहा हवामानाचा अंदाज