TRENDING:

Pune Weather: पुणे, साताऱ्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट, सांगलीत काय स्थिती? पाहा आजचं हवामान

Last Updated:
Pune Weather: पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत हलका पाऊस हजेरी लावतो आहे. पुणे आणि सातारा घाटमाथ्यावर मात्र जोरदार पावसाची शक्यता कायम असून सतर्कतेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
advertisement
1/7
पुणे, साताऱ्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट, सांगलीत काय स्थिती? पाहा आजचं हवामान
राज्यातील बहुतांश परिसरात पावसाचा जोर कायम आहे. पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळतो आहे. आज दिनांक 30 जून रोजी पुणे आणि सातारा घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता कायम आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत हलका पाऊस हजेरी लावतो आहे.
advertisement
2/7
पुणे आणि सातारा घाटमाथ्यावर मात्र जोरदार पावसाची शक्यता कायम असून सतर्कतेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. मागील 24 तासात पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर परिसरात 2.9 मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला. पुढील 24 तासात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच कमाल तापमान 29 अंशावर पोहचण्याचा अंदाज आहे. पुणे घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.
advertisement
3/7
मागील 24 तासात कोल्हापूर परिसरात 3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासात कोल्हापूर घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा यलो अलर्ट कायम आहे. तसेच उर्वरित जिल्ह्यात ढगाळ आकाशासह मध्यम पावसाची शक्यता आहे. यावेळी कमाल तापमान 30 अंश सेल्सिअसवर राहिल.
advertisement
4/7
मागील 24 तासांमध्ये सातारा शहरात 7 मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला. कमाल तापमान 27.2 अंश सेल्सिअस राहिले. पुढील 24 तासात कमाल तापमान 27 अंशावर राहील. ढगाळ आकाशासह गडगडाटी पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे. सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
advertisement
5/7
पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील कमाल तापमानाचा पारा अंशतः कमी होवून 32 अंशावर राहिला. मागील 24 तासात पावसाची पूर्णपणेच उघडीप राहिली. पुढील 24 तासात गडगडाटी पावसाची शक्यता आहे. यावेळी पारा 32 अंशांवर राहिल.
advertisement
6/7
मागील 24 तासात सांगली जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच राहिली. 4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासात सांगली जिल्ह्यात ढगाळ आकाशासह गडगडाटी पावसाचा अंदाज आहे. यावेळी जिल्ह्यातील कमाल तापमान 30 तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस इतके राहील.
advertisement
7/7
पश्चिम बंगाल आणि बांग्लादेशच्या किनाऱ्यावर कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. त्याला लागून समुद्र सपाटीपासून 7.6 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा पंजाबच्या फिरोजपूर, सोनीपत, आयोध्या, गया, पुरुलिया, पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावरील कमी दाबाचे केंद्र ते आग्येय बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांपासून कमी दाब क्षेत्रापर्यंत आणखी एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Pune Weather: पुणे, साताऱ्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट, सांगलीत काय स्थिती? पाहा आजचं हवामान
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल