TRENDING:

Sharad Pawar : सुनबाई न बोलताच रात्रीच मुंबईला निघाल्या, शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतील लपलेला मेसेज काय होता?

Last Updated:
Sharad Pawar Press Conference (वैभव सोनवणे, प्रतिनिधी) : अजित पवार यांच्या निधनानंतर आता सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत. अशातच आता शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत खळबळ उडवली आहे.
advertisement
1/5
शरद पवारांच्या पत्रकार परिषदेचा अर्थ काय? दोन नेते टार्गेटवर!
सुनेत्रा पवार यांचा शपथविधी होणार हे मला माहित नाही असं म्हणून या सगळ्या खेळात आम्ही नाही, हे शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनिकरणावर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय.
advertisement
2/5
सुनेत्रा पवारांचा हा निर्णय मंत्री छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी अंतर्गत चर्चा करून घेतला असावा. तो त्यांचा पक्षांतर्गत निर्णय असेल, असं म्हणत शरद पवार यांनी दोघांना एक्सपोज करून टाकलं.
advertisement
3/5
एवढ्या घाईत हा निर्णय का झाला? ते माहीत नाही असं सांगून राष्ट्रवादीचं विलिनीकरण भाजपा, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंना नको आहे, ते विलिनीकरणाला घाबरत आहेत, असा मेसेज शरद पवारांनी पत्रकार परिषदेतून दिला.
advertisement
4/5
बारा तारखेला विलीनीकरण होणार होतं हे सांगून आत्ता दादांचा पक्ष जे वागत आहे ते दादांच्या अंतिम इच्छेविरूद्ध वागत आहे, हा संदेश तिकडच्या सामान्य कार्यकर्त्यांना देऊन टाकला. दादा म्हणजे आम्हीच.. पटेल तटकरे नव्हेत हे देखील शरद पवारांनी हायलाईट करून टाकलं.
advertisement
5/5
दरम्यान, अस्थी विसर्जनानंतर सुनेत्रा वहिनींचा कुटूंबाशी संवाद झालेला नाही. कोणतीही राजकीय चर्चा झालीच नाही, हे सांगून उर्वरित पवार कुटूंब या निर्णयात नाही, असं संदेश शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Sharad Pawar : सुनबाई न बोलताच रात्रीच मुंबईला निघाल्या, शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतील लपलेला मेसेज काय होता?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल