TRENDING:

बिबट्यचा हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू, शिरुरमध्ये ग्रामस्थ संतप्त; वन विभागाचं कार्यालय पेटवलं,रस्ता अडवला

Last Updated:
पिंपरखेडच्या संतप्त नागरिकांनी वन विभागाच्या कार्यालयाला आग लावली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. परिसरात सध्या प्रचंड तणावाचं वातावरण आहे.
advertisement
1/9
बिबट्यचा हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू, शिरुरमध्ये ग्रामस्थ संतप्त
शिरुर तालुक्यातील पिंपरखेड या गावातील एका 13 वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे संपूर्ण गावात संतापाची लाट पसरली आहे.
advertisement
2/9
शिरुरच्या पिंपरखेडमध्ये घडलेल्या या घटनेमुळे गावकरी प्रचंड संतप्त झाले आहे. गावकऱ्यांनी या घटनेनंतर वन विरोधाच्या आक्रमक भूमिका घेतली आहे.
advertisement
3/9
पिंपरखेडच्या संतप्त नागरिकांनी वन विभागाच्या कार्यालयाला आग लावली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. परिसरात सध्या प्रचंड तणावाचं वातावरण आहे.
advertisement
4/9
ग्रामस्थांनी आधी वन विभागाची गाडी पेटवून दिली. त्यानंतर रास्ता रोको करत दुसरीकडे कार्यालयाला देखील आग लावली आहे
advertisement
5/9
संतप्त ग्रामस्थांनी वेल्हे, जेजुरी आणि अष्टविनायक महामार्ग अडवत वन विभागाचं कार्यालय पेटवून दिलं आहे.
advertisement
6/9
रास्ता रोको आंदोलनामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे
advertisement
7/9
वनमंत्री किंवा जिल्हाधिकारी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत प्रेत हलवणार नाही, अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
advertisement
8/9
मुलाचा मृतदेह घराबाहेर ठेवत त्याच्या नातेवाईकांसह गावकऱ्यांनी आंदोलन केलं.
advertisement
9/9
या घटनेनंतर परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात झाला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
बिबट्यचा हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू, शिरुरमध्ये ग्रामस्थ संतप्त; वन विभागाचं कार्यालय पेटवलं,रस्ता अडवला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल