Weather Alert: महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळी संकट, सोमवारी धो धो पाऊस, या जिल्ह्यांना यलो अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
Weather Alert: नोव्हेंबर महिना सुरू झाला तरी पावसाचा जोर कायम आहे. सोमवारी पुन्हा अवकाळी संकट घोंघावत असून पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
1/8

महाराष्ट्रात मे महिन्यापासून पावसाळा सुरू असल्याचे चित्र असून नोव्हेंबरमध्ये देखील पावसाचा जोर कायम आहे. मराठवाडा, विदर्भासह मुंबई आणि कोकणात देखील रविवारी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली. त्याननंतर सोमवारी देखील राज्यातील काही भागात पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील 4 जिह्यांना पुन्हा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 3 नोव्हेंबरचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
2/8
सोमवारी मुंबई शहर आणि उपनगरात ढगाळ आकाशासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता कुलाबा वेधशाळेने वर्तवली आहे. तर कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. कोकण विभागातील अन्य जिल्ह्यांमध्ये देखील असेच हवामान राहील.
advertisement
3/8
राज्यातील मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पुढील 2 दिवस पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सांगली, सोलापूर मध्ये विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. तर सोलापूर जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
4/8
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात ढगाळ हवामान पहायला मिळेल.
advertisement
5/8
Weather Alert: मराठवाड्यात हवापालट, आज पाऊस की उघडीप, IMD कडून महत्त्वाचं अपडेट
advertisement
6/8
मराठवाड्यात धाराशिव, लातूर, आणि बीड या तीन जिल्ह्यांत विजांसह जोरदार पावसाची शक्यता आहे. या काळात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहतील. तर छत्रपती संभाजीनगरसह उर्वरित जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता आहे.
advertisement
7/8
विदर्भात सोमवारी ढगाळ हवामान राहणार आहे. तसेच तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी हलक्या सरी वगळल्यास विदर्भात जोरदार पावसाची शक्यता नाही. तसेच सोमवारी कोणत्याही जिल्ह्याला पावसाचा महत्त्वाचा अलर्ट नाही.
advertisement
8/8
दरम्यान, मोंथा चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाल्यानंतरही राज्यावरील अवकाळी संकट कायम आहे. मराठवाडा आणि सोलापूर परिसरात पावसाचा जोर पुन्हा वाढत असल्याने चिंता वाढली आहे. येत्या 5 नोव्हेंबरपर्यंत हवामानाची हीच स्थिती राहणार असल्याने शेतकरी आणि नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळी संकट, सोमवारी धो धो पाऊस, या जिल्ह्यांना यलो अलर्ट