चक्रवादळाने बिघडवला प्लान, तरीही झुकेगा नही साला! अल्लू अर्जुनच्या धाकट्या भावाचा शाही साखरपुडा, कोण आहे होणारी वहिनी?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Allu Sirish Engagement : सुपरस्टार अल्लू अर्जुनचा धाकटा भाऊ आणि अभिनेता अल्लू सिरीश याने त्याची प्रेयसी नयनिका हिच्यासोबत साखरपुडा करत आपल्या आयुष्याची नवी इनिंग सुरू केली आहे.
advertisement
1/10

मुंबई : टॉलीवूडमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे! सुपरस्टार अल्लू अर्जुनचा धाकटा भाऊ आणि अभिनेता अल्लू सिरीश याने त्याची प्रेयसी नयनिका हिच्यासोबत साखरपुडा करत आपल्या आयुष्याची नवी इनिंग सुरू केली आहे.
advertisement
2/10
एका खासगी आणि शाही समारंभात दोघांनी आपल्या नात्यावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब केले. या सोहळ्याला चिरंजीवी, राम चरण यांच्यासह संपूर्ण अल्लू आणि कोनिडेला कुटुंबाने हजेरी लावली होती.
advertisement
3/10
अल्लू सिरीश आणि नयनिकाच्या साखरपुड्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती. अल्लू सिरीशने १ ऑक्टोबर रोजी पॅरिसमधून नयनिकासोबतचा फोटो शेअर करत आधीच याबद्दल संकेत दिले होते.
advertisement
4/10
३१ ऑक्टोबरच्या साखरपुड्यापूर्वी सिरीशने पोस्ट करून सांगितले की, चक्रवादळामुळे त्यांचे बाहेर समारंभ करण्याचे नियोजन बिघडले. पण, आत मात्र हा सोहळा अत्यंत शानदार पद्धतीने पार पडला.
advertisement
5/10
साखरपुड्यानंतर सिरीशने नयनिकासोबतचे सुंदर फोटो शेअर करत लिहिले, "मी अखेर माझ्या आयुष्यातील प्रेयसी, नयनिकासोबत आनंदाने साखरपुडा करत आहे!"
advertisement
6/10
'पुष्पा' फेम अल्लू अर्जुन आणि त्याचा चुलत भाऊ राम चरण यांनी या नव्या जोडप्याला खास शुभेच्छा दिल्या. राम चरणने कुटुंबासोबतचा एक ग्रुप फोटो शेअर केला, ज्यात त्याने सिरीशचा हात धरला आहे.
advertisement
7/10
राम चरणने कॅप्शनमध्ये लिहिले, "अल्लू सिरीश, तुझ्यासाठी खूप आनंद झाला! तुला आणि नयनिकाला खूप आनंद, प्रेम आणि आयुष्याच्या साथीसाठी शुभेच्छा." या फोटोत लावण्या त्रिपाठी, वरूण तेज, स्नेहा रेड्डी हे कुटुंबातील सदस्य दिसत होते.
advertisement
8/10
याव्यतिरिक्त, अभिनेते चिरंजीवी, नागा बाबू, पवन कल्याणची पत्नी अन्ना लेजनेवा, साई दुर्गा तेज आणि वैष्णव तेज यांनीही उपस्थिती दर्शवली.
advertisement
9/10
अल्लू अर्जुनच्या घरात येणारी नयनिका ही हैदराबादमधील एका प्रतिष्ठित व्यावसायिक कुटुंबातील आहे. रिपोर्ट्सनुसार, नयनिका रेड्डी आणि अल्लू सिरीश यांची भेट काही वर्षांपूर्वी एका कॉमन फ्रेंडद्वारे झाली होती. दोघांनी सुमारे दोन वर्षे आपले नाते लोकांसमोर येऊ दिले नव्हते.
advertisement
10/10
अल्लू सिरीश २०१९ मध्ये आलेल्या 'बडी' चित्रपटात शेवटचा दिसला होता. या साखरपुड्यानंतर आता चाहते त्यांच्या लग्नाच्या तारखेची वाट पाहत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
चक्रवादळाने बिघडवला प्लान, तरीही झुकेगा नही साला! अल्लू अर्जुनच्या धाकट्या भावाचा शाही साखरपुडा, कोण आहे होणारी वहिनी?