आजचं हवामान: वादळी पाऊस पुन्हा झोडपणार, सांगली, साताऱ्याला अलर्ट, पुण्यात काय स्थिती?
- Reported by:Priti Nikam
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Pune Rain Alert: पश्चिम महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत पावसाने उघडीप घेतली होती. आता पुन्हा पावसाचा जोर वाढणार असून हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.
advertisement
1/7

राज्यात पावसाने उघडीप देताच उन्हाचा चटका तापदायक ठरू लागला. पश्चिम महाराष्ट्रात देखील गेल्या काही दिवसांत पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. आज 11 जून रोजी सातारा, सांगली, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता असल्याने, तसेच उर्वरित राज्यात विजांसह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.
advertisement
2/7
पुणे जिल्ह्यात मागील 24 तासात 31.5 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. पुढील 24 तासात कमाल तापमान 33 अंशावर राहिल. वादळासह मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुणे परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
3/7
मागील 24 तासात सांगली जिल्ह्यातील कमाल तापमान 32.8 अंशवर राहिले. तसेच 5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासात सांगली जिल्ह्यात प्रतितास 30 ते 40 किलोमीटर वेगवान वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज आहे. गडगडाटी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा येलो अलर्ट हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
advertisement
4/7
साताऱ्यातील पारा 32.4 अंश सेल्सिअसवर राहिला. पुढील 24 तासात सातारा जिल्ह्यातील कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस राहिल. जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह प्रतितास 40-50 किलोमीटर वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा येलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
advertisement
5/7
सोलापूर जिल्ह्यातील कमाल तापमान 29 अंशावर राहिले. मागील 24 तासात 5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासात मात्र तापमानात वाढ होवून पारा 35 अंशावर जाण्याचा अंदाज आहे. आकाश ढगाळ राहून वादळी वाऱ्यासह मध्यम पावसाचा यलो अलर्ट भारतीय हवामान विभागाने दिला आहे.
advertisement
6/7
कोल्हापुरातील कमाल तापमान 31.4 अंशांवर राहिले आहे. पुढील 24 तासात कोल्हापुरातील कमाल तापमान 31 अंशावर स्थिर राहील. पुढील 24 तासात साधारणपणे ढगाळ आकाशासह एक दोनवेळा हलक्या पावसाची शक्यता आहे.
advertisement
7/7
नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी यंदा वेगाने प्रगती करत मे महिन्यात महाराष्ट्रात धडक दिली. मंगळवारी महाराष्ट्रातील मुंबई, अहिल्यानगर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांच्या काही भागातील मान्सूनची वाटचालीची सीमा 'जैसे थे' होती. मन्सूनच्या वाटचालीस पोषक हवामान होत असल्याने 14 जूनपर्यंत मध्य भारत आणि पूर्व भारताच्या काही भागात मान्सूनची चाल होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
आजचं हवामान: वादळी पाऊस पुन्हा झोडपणार, सांगली, साताऱ्याला अलर्ट, पुण्यात काय स्थिती?