TRENDING:

Pune Rain: पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा हवापालट, पुणे ते कोल्हापूर 24 तासांचा हवामान अंदाज

Last Updated:
Pune Rain: पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. पुणे ते कोल्हापूर घाटमाथा वगळता इतर भागात पावसाचा जोर ओसरणार आहे..
advertisement
1/7
पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा हवापालट, पुणे ते कोल्हापूर 24 तासांचा हवामान अंदाज
राज्यात मान्सून दाखल झाल्याने काही भागात जोरदार पाऊस पडत आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक आहे. पुढील 24 तास संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. मात्र हवामान विभागाने कोल्हापूर घाटमाथ्यास दक्षतेचा येलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
2/7
कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पुढील 24 तासात कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्‍यता असल्याने दक्षतेचा यलो अलर्ट दिला आहे. यावेळी जिल्ह्यातील कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस राहिल.
advertisement
3/7
सातारा जिल्ह्यात पावसाने थैमान घातले होते. मागील 24 तासांपासून पावसाने उघडीप दिली आहे. साताऱ्यातील कमाल तापमान 27 अंशापर्यंत राहिल. तसेच पुढील 24 तासात सातारा जिल्ह्यात साधारणपणे ढगाळ आकाश आणि मध्यम पावसाची शक्यता आहे.
advertisement
4/7
पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी मध्यम पाऊस कोसळतो आहे. पुढील 24 तासात पुणे आणि पुणे घाट प्रदेशातील एक दोन ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. यावेळी पुण्यातील कमाल तापमानात 28 अंश सेल्सिअस राहिल.
advertisement
5/7
सांगली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस आहे. पुढील 24 तास जिल्ह्यातील कमाल तापमान 27 अंश सेल्सिअस राहिल. जिल्ह्यात दिवस-रात्र रिमझिम पाऊस सुरूच आहे.
advertisement
6/7
सोलापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मध्यम पावसाची शक्यता आहे. तर पुढील काही दिवस कमाल तापमान 31 अंशावर राहण्याचा अंदाज आहे.
advertisement
7/7
अवकाळी पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातला असून शेतामध्ये पाणी साचले आहे. यामुळे मशागतीची कामे खोळंबली असून पेरणी, ऊस लागणी तसेच हळद लागणी लांबणीवर पडल्या आहेत. जिथे जास्त पाऊस झाला आहे, त्याठिकाणाच्या शेतकऱ्यांना थांबावं लागेल. जोपर्यंत वापसा येत नाही तोपर्यंत पेरणी करता येणार नाही अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Pune Rain: पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा हवापालट, पुणे ते कोल्हापूर 24 तासांचा हवामान अंदाज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल