Weather Alert: पावसाचा जोर ओसरला! पश्चिम महाराष्ट्राच्या 5 जिल्ह्यांत काय स्थिती? 21 जूनचा हवामान अंदाज
- Reported by:Priti Nikam
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Pune Rain: पश्चिम महाराष्ट्रात मान्सूनचा जोर ओसरला आहे. घाट भागाता पावसाचा अलर्ट कायम असून कोल्हापूर ते पुणे आजचा हवामानाचा अंदाज जाणून घेऊ.
advertisement
1/7

राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी होणार असला, तरी कोकण आणि घाटमाथ्यावर तीव्रता कायम आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा दिला आहे. पश्चिम महाराष्ट्रात देखील घाटभागात जोरदार पावसाची शक्यता असून पुणे आणि सातारा घाट भागात यलो अलर्ट कायम आहे. पुढील 24 तासांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/7
गेल्या 24 तासांत सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे 210 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तसेच सातारा शहरात 29 मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला. आज हलक्या पावसात आकाश साधारणपणे ढगाळ राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
3/7
पुणे जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरूच आहे. मागील 24 तासात शिवाजीनगर परिसरात 25 .4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तसेच 28.6 अंश सेल्सिअस कमाल तापमान राहिले. पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.
advertisement
4/7
गेल्या 24 तासात कोल्हापुरात 7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. शुक्रवारी रात्री कोल्हापूर परिसरात मुसळधार पाऊस झाला. पुढील 24 तासात कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस असेल. हलक्या पावसासह आकाश साधारणपणे ढगाळ राहील.
advertisement
5/7
सोलापूर जिल्ह्यातील कमाल तापमानात वाढ झाली असून मागील 24 तासात पारा 34.1 अंशावर राहिला. तसेच 2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासात आकाश साधारणपणे ढगाळ राहून हलक्या पावसाची शक्यता आहे. यावेळी कमाल तापमान 35 अंशांवर राहिल. आज ढगाळ आकाशासह हलक्या पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
advertisement
6/7
गेल्या 24 तासात सांगली जिल्ह्यात 4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासात सांगली जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे. यावेळी जिल्ह्यातील कमाल तापमान 31 तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस इतके राहील.
advertisement
7/7
पश्चिम महाराष्ट्रात घाट भाग वगळता कोणत्याही जिल्ह्याला सतर्कतेचा अलर्ट दिलेला नाही. तरीही काही जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: पावसाचा जोर ओसरला! पश्चिम महाराष्ट्राच्या 5 जिल्ह्यांत काय स्थिती? 21 जूनचा हवामान अंदाज