पश्चिम महाराष्ट्रात हवापालट, पुण्यात कुठं धो धो कोसळणार? वाचा आजचा हवामान अंदाज
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
Pune Rain: पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. आज पुण्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
1/7

राज्यातील बहुतांश भागात पावसाची तीव्रता घटली आहे. मात्र, कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात देखील तुरळक पावसाच्या सरी बरसत आहेत. आज पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. पुढील 24 तासांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/7
गेल्या 24 तासामध्ये सातारा शहरात 8 मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला. यावेळी कमाल तापमान 28.7 अंश सेल्सिअस राहिले. पुढील 24 तासात कमल तापमान 30 अंशावर राहील. मध्यम पावसासह आकाश साधारणपणे ढगाळ राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
3/7
पुणे जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरूच आहे. मागील 24 तासात शिवाजीनगर परिसरात 2.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तसेच 29.2 अंश सेल्सिअस कमाल तापमान राहिले. पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.
advertisement
4/7
कोल्हापूर परिसरात 24 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासात कमाल तापमान 28.1 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस वर असेल. हलक्या पावसासह आकाश साधारणपणे ढगाळ राहील. घाट भागात यलो अलर्ट असणार आहे.
advertisement
5/7
सोलापूर जिल्ह्यातील कमाल तापमानात वाढ झाली असून मागील 24 तासात पारा 34 अंशावर राहिला. पुढील 24 तासात आकाश साधारणपणे ढगाळ राहून हलक्या पावसाची शक्यता आहे. यावेळी कमाल तापमान 34 अंशांवर स्थिर राहील.
advertisement
6/7
गेल्या 24 तासात सांगली जिल्ह्यात 3 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आज सांगली जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे. यावेळी जिल्ह्यातील कमाल तापमान 30 तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतके राहील.
advertisement
7/7
हवामानातील बदलांमुळे पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरला आहे. पुणे घाट भागात आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित पश्चिम महाराष्ट्रात तुरळक हलका पाऊस होईल. पुढील काही दिवस हीच स्थिती कायम राहणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
पश्चिम महाराष्ट्रात हवापालट, पुण्यात कुठं धो धो कोसळणार? वाचा आजचा हवामान अंदाज