TRENDING:

Weather Alert: अवकाळी संकट सरलं आता पुन्हा नवं संकट, पश्चिम महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट

Last Updated:
पश्चिम महाराष्ट्रातील अनेक ठिकाणांना अवकाळी पावसाने झोडपले असून कमाल तापमानात काहीशी घट झाली आहे. आज दिनांक 28 एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रात सर्वत्र आकाश निरभ्र राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
advertisement
1/7
अवकाळी संकट सरलं पुन्हा नवं संकट, 4 जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट
पश्चिम महाराष्ट्रातील अनेक ठिकाणांना अवकाळी पावसाने झोडपले असून कमाल तापमानात काहीशी घट झाली आहे. आज दिनांक 28 एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रात सर्वत्र आकाश निरभ्र राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. काल दिनांक 27 एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रातील सरासरी तापमान 20.2 ते 42.5 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहीले. पुढील 24 तासात पश्चिम महाराष्ट्रातील हवामान स्थितीबाबत अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/7
पुणे जिल्ह्यात उष्णतेचा चटका कायम असून मागील 24 तासात 39.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर पुढील 24 तासात पुण्यातील पारा 40 अंशांवर जाण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. पुण्यातील आकाश मुख्यता निरभ्र राहील.
advertisement
3/7
सांगली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्याने हजेरी लावली. उन्हाच्या झळांनी होरपळणाऱ्या वातावरणात जिल्ह्याने वादळी पाऊस अनुभवला. पुढील 24 तासात सांगली जिल्ह्यातील कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहिल. सांगली जिल्ह्यात आकाश मुख्यता निरभ्र राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
advertisement
4/7
सातारा जिल्ह्यातील पारा पुढील 24 तासात स्थिर राहील. कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. साताऱ्यात काल अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. आज मात्र सातारा जिल्ह्यातील आकाश निरभ्र राहणार आहे.
advertisement
5/7
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली. कोल्हापुरातील पारा 36 अंशापर्यंत उतरला असून पुढील 24 तासात कोल्हापुरातील पारा अंशतः वाढू शकतो. कमाल 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस इतके राहील. आकाश निरभ्र राहील.
advertisement
6/7
सोलापूर जिल्ह्यात मागील 24 तासात कमाल तापमान 41.1 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24.6 अंश सेल्सिअस इतके होते. पुढील 24 तासात आकाश निरभ्र राहील. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील कमाल तापमान 41 अंशांवर तर किमान तापमान 25 अंशांवर असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. पुढील चार दिवस सोलापुरातील तापमानात वाढ होणार असून पारा पुन्हा 45 अंशापर्यंत पोहोचणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
advertisement
7/7
पश्चिम विदर्भापासून मराठवाडा, कर्नाटक, तामिळनाडू ते मनारच्या आखातापर्यंत दक्षिणोत्तर हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. राज्यात उन्हाचा चटका, उकाडा आणि घामाच्या धारा तापदायक ठरत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तास निरभ्र आकाश राहणार असून उन्हाचे चटके सहन करावे लागणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: अवकाळी संकट सरलं आता पुन्हा नवं संकट, पश्चिम महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल