पुण्यात गारठा कायम, पश्चिम महाराष्ट्रातील वातावरणात मोठे बदल, पाहा आजचं हवामान अपडेट
- Reported by:Prachi Balu Kedari
- Published by:Mohan Najan
Last Updated:
Western Maharashtra Weather update: पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. 11 जानेवारीला पुण्यामध्ये सकाळी धुके आणि नंतर निरभ्र आकाश असण्याची शक्यता आहे.
advertisement
1/5

11 जानेवारीला पुण्यामध्ये सकाळी धुके आणि नंतर निरभ्र आकाश असण्याची शक्यता आहे. पुण्यातील कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस इतकं असणार आहे. शेतकऱ्यांनी गहू आणि हरभरा पिकांना आवशक्यतेनुसार पाणी द्यावे.
advertisement
2/5
सातारा जिल्ह्यातील काहीशी थंडी कमी झाली असून 29 अंश सेल्सीअस कमाल तर 16 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल. शेतकऱ्यांनी सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी फळांची पक्वतेनुसार काढणी सुरू ठेवावी.
advertisement
3/5
सांगली जिल्ह्यातील वातावरण सकाळी सूर्यप्रकाशित तर दुपारी ढगाळ राहणार आहे. 29 अंश सेल्सीअस कमाल तर 16 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल.
advertisement
4/5
कोल्हापूरमध्ये वातावरण हे बहुतांशी सूर्यप्रकाशित राहणार आहे. 31 अंश सेल्सीअस कमाल तर 17 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल.
advertisement
5/5
सोलापूरमध्ये 31 अंश सेल्सीअस कमाल तर 19 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल. वातावरण अंशता ढगाळ राहणार आहे. काढणीस आलेल्या तूर पिकाची काढणी करावी.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
पुण्यात गारठा कायम, पश्चिम महाराष्ट्रातील वातावरणात मोठे बदल, पाहा आजचं हवामान अपडेट