पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा जोर कमी, पुण्यात काय स्थिती? पाहा आजचं हवामान
- Reported by:Prachi Balu Kedari
- Published by:Mohan Najan
Last Updated:
Western Maharashtra Weather update : पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. आजच्या हवामान स्थिती बदल जाणून घ्या.
advertisement
1/5

पुणे जिल्ह्यातील वातावरण हे सकाळी सूर्यप्रकाशित राहणार असून दुपार नंतर ढगाळ राहणार आहे. 30 अंश सेल्सीअस कमाल तर 16 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल. त्यामुळे काही प्रमाणात थंडीच प्रमाण कमी झालं आहे.
advertisement
2/5
सातारा जिल्ह्यात 30 अंश सेल्सीअस कमाल तर 17 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल. वातावरण हे सूर्यप्रकाशित राहणार असून हवेची गुणवत्ता मध्यम स्वरूपाची राहणार आहे.
advertisement
3/5
सांगलीमध्ये वातावरण ढगाळ राहणार असून 32 अंश सेल्सीअस कमाल तर 20 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल. हवेत दमट पणा असून वातावरण काही अंशी ढगाळ राहणार आहे.
advertisement
4/5
कोल्हापूरमध्ये आज 32 अंश सेल्सीअस कमाल तर 19 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल. तर शेतकऱ्यांनी आपली शेतीतील सर्व कामे उरकून घ्यावी.
advertisement
5/5
सोलापूरमध्ये आज बहुतांशी सूर्यप्रकाशित वातावरण राहणार असून 32 अंश सेल्सीअस कमाल तर 20 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल. हवेची गुणवत्ता ही मध्यम स्वरूपाची असेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा जोर कमी, पुण्यात काय स्थिती? पाहा आजचं हवामान