साताऱ्यात ढगाळ वातावरण तर पुण्यात थंडी कायम, पाहा आजचा हवामान अंदाज
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
Western Maharashtra Weather update: पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. पुण्यात थंडीचा जोर कायम असून आज साताऱ्यात ढगाळ वातावरण असेल.
advertisement
1/5

पुण्यात आज 29 अंश सेल्सीअस कमाल तर 14 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल. वातावरण हे सूर्यप्रकाशित राहणार असून काढणीस आलेल्या तूर पिकाची लवकरात लवकर कापणी करावी.
advertisement
2/5
सातारा जिल्ह्यात शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी पिकाची काढणी करावी. ढगाळ वातावरण राहणार असून 29 अंश सेल्सीअस कमाल तर 14 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल.
advertisement
3/5
सांगलीमध्ये 31 अंश सेल्सीअस कमाल तर 16 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल. शेतकऱ्यांनी बागायती ज्वारीला पाणी द्यावे.
advertisement
4/5
कोल्हापुरात कमाल तापमान हे 1 अंशांनी वाढले आहे. 31अंश सेल्सीअस कमाल तर 15 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल. तर उसाची लागवड करण्यासाठी योग्य वातावरण तयार होत आहे.
advertisement
5/5
सोलापूरमध्ये हवेची गुणवत्ता मध्यम असून 30 अंश सेल्सीअस कमाल तर 16 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल. तापमान बदल हा जाणवत आहे.