Weather Alert: कोल्हापूर, सांगलीवर आस्मानी संकट, सोलापूरला यलो अलर्ट, आजचं हवामान
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात वादळी पावसाने हजेरी लावली. आज 24 एप्रिल रोजी हवामान आणि तापमान स्थितीबाबत जाणून घेऊ.
advertisement
1/7

सूर्याच्या तडाख्यामुळे महाराष्ट्रतील अनेक भाग उष्णतेने होरपळत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामानाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मागील 24 तासात पश्चिम महाराष्ट्रातील सरासरी तापमान 19.7 ते 43.5 अंश सेल्सिअस दरम्यान राहीले होते. पुढील 24 तासात पश्चिम महाराष्ट्रातील हवामान स्थितीबाबत अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/7
सोलापूर जिल्ह्यात मागील 24 तासात कमाल तापमान 43.4 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 29.1 अंश सेल्सिअस इतके होते. पुढील 48 तासांसाठी सोलापूर जिल्ह्याला उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील कमाल तापमान 41 अंशांवर तर किमान तापमान 26 अंशांवर जाण्याचा अंदाज आहे. उष्णतेच्या लाटेपासून संरक्षण म्हणून योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने नागरिकांना केले आहे.
advertisement
3/7
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वादळी पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह जिल्ह्यात 30 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पावसामुळे उकाड्याने त्रासलेल्या नागरिकांना तात्पुरता गारवा मिळाला असून पुढील 24 तासात कोल्हापुरातील कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस इतके राहील.
advertisement
4/7
सातारा जिल्ह्यातील पारा 40.9 अंशांवर असून पुढील 24 तासात साताऱ्यातील तापमान अंशतः वाढणार आहे. साताऱ्यातील कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
advertisement
5/7
सांगलीतील मिरज आणि तासगाव येथे बुधवारी प्रत्येकी 10 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. काही ठिकाणी झालेल्या गारपिटीमुळे नवीन काडी तयार होत असलेल्या द्राक्षबागांना फटका बसला आहे. पुढील 24 तासात सांगली जिल्ह्यातील कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस राहील. जिल्ह्यात उष्ण व दमट हवामानाचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.
advertisement
6/7
पुणे जिल्ह्यात देखील उष्णतेचा चटका कायम असून मागील 24 तासात 39.9 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर पुढील 24 तासात पुण्यातील पारा 40 अंशांवर जाण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच सांगली सोलापूर सह पुण्यात देखील उष्ण व दमट हवामानाचा अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
7/7
पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत अवकाळी संकट घोंघावत असून सोलापूरसह, पुणे आणि सांगलीत उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे. गारपीट आणि वादळी पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करावे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: कोल्हापूर, सांगलीवर आस्मानी संकट, सोलापूरला यलो अलर्ट, आजचं हवामान