TRENDING:

आजचं हवामान: पश्चिम महाराष्ट्रावर आस्मानी संकट, 24 तास धोक्याचे, पुण्यात वेगळीच स्थिती

Last Updated:
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यांवर आज आस्मानी संकट घोंघावत असून हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. पुण्यात मात्र वेगळीच स्थिती आहे.
advertisement
1/7
पश्चिम महाराष्ट्रावर आस्मानी संकट, 24 तास धोक्याचे, पुण्यात वेगळीच हवामान स्थिती
राज्यभर उष्णतेने कहर केला आहे. विदर्भातील ब्रह्मपुरी आणि अकोला येथे तापमानाने 45 अंशांचा उच्चांक गाठला. तर पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक तापमान नोंदवलं गेलंय. आज, 26 एप्रिल रोजी राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असून लातूर, धाराशिव, नांदेड जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्रात देखील अलर्ट देण्यात आला आहे. पुढील 24 तासांची हवामान व तापमान स्थिती जाणून घेऊ.
advertisement
2/7
गेल्या 24 तासात पश्चिम महाराष्ट्रातील सरासरी तापमान 21.0 ते 43.5 अंश सेल्सिअस दरम्यान राहीले. सोलापूर जिल्ह्यात शुक्रवारी कमाल तापमान 42.3 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 28.9 अंश सेल्सिअस इतके होते. पुढील 24 तासांसाठी सोलापूर जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह गारपीटीचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. आज कमाल तापमान 42 अंशांवर तर किमान 27 अंशांवर राहील.
advertisement
3/7
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली. हातकणंगले येथे 10 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पावसामुळे उकाड्याने त्रासलेल्या नागरिकांना तात्पुरता गारवा मिळाला असून पुढील 24 तासात कोल्हापुरातील पारा काही अंशी उतरून कमाल 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतका राहील. तसेच वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
4/7
सातारा जिल्ह्यातील पारा पुढील 24 तासात स्थिर राहील. कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आकाश अंशतः ढगाळ राहून तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस आणि वीजांच्या गडगडाटाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
advertisement
5/7
सांगली जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली. सांगलीतील कसबेडिग्रज येथे 10 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासात सांगली जिल्ह्यातील कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस राहिल. जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहून गडगडाटी वादळासह पावसाची शक्यता आहे.
advertisement
6/7
पुणे जिल्ह्यात देखील उष्णतेचा चटका कायम असून मागील 24 तासात 40.5 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर पुढील 24 तासात पुण्यातील पारा 41 अंशांवर जाण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. पुण्यातील आकाश मुख्यता निरभ्र राहील.
advertisement
7/7
दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या चार जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
आजचं हवामान: पश्चिम महाराष्ट्रावर आस्मानी संकट, 24 तास धोक्याचे, पुण्यात वेगळीच स्थिती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल