Weather Alert: ऑगस्टअखेर पावसाचा जोर, पश्चिम महाराष्ट्रातील 3 जिल्ह्यांना यलो अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रातील घाट भागात पावसाचा जोर कायम आहे. आज पुन्हा 3 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून जोरदार पावसाची शक्यता आहे.
advertisement
1/5

ऑगस्टअखरे राज्यातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात आज वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून तीन जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 31 ऑगस्टचा हवामानाचा अंदाज जाणून घेऊ
advertisement
2/5
पुण्यातील घाट परिसरात जोरदार पावसाची शक्यता असून आजही यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील 24 तासांत या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मात्र उर्वरित जिल्ह्यात हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. या काळात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून ढगांचा गडगडाट आणि विजांसह पाऊस होईल.
advertisement
3/5
सातारा जिल्ह्यात देखील रविवारी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 24 तास साताऱ्यासह घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज आहे. उर्वरीत भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
4/5
मागील 2 दिवसांपासून कोल्हापुरात घाट परिसरात जोरदार पाऊस कोसळत आहे. आज देखील यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून सततच्या पावसामुळे धरणातील पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.
advertisement
5/5
सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून तुरळक, हलक्या पावसाच्या सरी बरसत आहेत. आजदेखील या जिल्ह्यांसाठी कोणताही विशेष अलर्ट देण्यात आलेला नाही. आज तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे, तर हवामान काही प्रमाणात ढगाळ राहील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: ऑगस्टअखेर पावसाचा जोर, पश्चिम महाराष्ट्रातील 3 जिल्ह्यांना यलो अलर्ट