मे आधीच होरपळलं सोलापूर! पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा हवापालट होणार? कसं असेल आजचं हवामान
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
पश्चिम महाराष्ट्रातील तापमानात पुन्हा वाढ झालेली दिसून येत आहे. त्याचबरोबर तुरळक जिल्ह्यांत पुढील 2 दिवसांत हलक्या पावसाची शक्यता असल्याचं देखील हवामान विभागानं सांगितलंय.
advertisement
1/5

राज्यातील तापमानात सतत बदल होत आहे. मुंबईतील तापमानात काहीशी घट बघायला मिळत आहे. तर विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. अशातच पश्चिम महाराष्ट्रातील तापमानात गेल्या दोन ते तीन दिवसांत घट झालेली दिसून येत होती. आज पश्चिम महाराष्ट्रातील तापमानात काहीशी वाढ बघायला मिळत आहे.
advertisement
2/5
पुण्यातील तापमानात गेले दोन दिवस स्थिर असल्याचे दिसून येत आहे. आज 17 मार्च रोजी पुण्यातील कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. पुण्यात आज मुख्यतः निरभ्र आकाश राहून सायंकाळी किंवा रात्री अंशतः ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पुढील 2 दिवसांत पुण्यातील तापमानात वाढ होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
advertisement
3/5
साताऱ्यातील कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. तेथील तापमानात देखील काहीशी वाढ झालेली दिसून येत आहे. साताऱ्यात आज मुख्यतः निरभ्र आकाश असू शकतं. सांगलीतील कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. सांगलीत मुख्यतः निरभ्र आकाश असू शकतं. सांगलीतील तापमानात पुढील 24 तासांत आणखी वाढ होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
advertisement
4/5
सोलापूरमधील तापमानात पुन्हा वाढ झालेली दिसून येत आहे. तेथील कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. त्याठिकाणी आज मुख्यतः निरभ्र आकाश असू शकतं. त्याचबरोबर हवापालट होऊन सोलापुरात पुढील दोन दिवसांत पावसाची शक्यता असल्याचं देखील हवामान विभागानं सांगितलय. कोल्हापूरमधील कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. तेथील तापमानात अंशतः वाढ झालेली दिसून येत आहे. कोल्हापुरात आज मुख्यतः निरभ्र आकाश असू शकतं.
advertisement
5/5
पश्चिम महाराष्ट्रातील तापमानात गेल्या दोन दिवसांत काहीशी घट बघायला मिळाली होती. आता मात्र काही जिल्ह्यांतील तापमानात पुन्हा वाढ होताना दिसून येत आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिक कासावीस झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी उन्हापासून स्वतःचे संरक्षण करणे आवश्यक आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
मे आधीच होरपळलं सोलापूर! पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा हवापालट होणार? कसं असेल आजचं हवामान