TRENDING:

Weather Update: 24 तास महत्त्वाचे, सोलापुरात पारा पुन्हा चढला, पाहा पश्चिम महाराष्ट्रातील हवामान अंदाज

Last Updated:
मार्च महिन्याच्या सुरूवातीपासून राज्यातील तापमानात चढ-उतार होताना दिसून येत आहे. पुढील 24 तासांत पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांतील तापमानात वाढ होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. 
advertisement
1/6
24 तास महत्त्वाचे, सोलापुरात पारा पुन्हा चढला, पाहा पश्चिम महाराष्ट्रातील हवामान
मार्च महिन्याच्या सुरूवातीपासून राज्यातील तापमानात चढ-उतार होताना दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील तापमानात घट होऊन विविध ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. आता पुन्हा हवामानात बदल जाणवत असून विविध ठिकाणी तापमानात वाढ होताना दिसून येत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील तापमानात देखील अंशतः वाढ झालेली बघायला मिळत आहे. त्याचबरोबर पुढील काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
advertisement
2/6
पुण्यातील कमाल तापमान गेले काही दिवस 38 अंशावर स्थिर असल्याचे दिसून येत आहे. तर आज 24 मार्च रोजी किमान तापमान 18 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. त्याठिकाणी आज मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. पुढील काही दिवसांत पुण्यातील तापमानात घट होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
advertisement
3/6
कोल्हापुरातील तापमानात अंशतः वाढ झालेली दिसून येत आहे. आज 24 मार्च रोजी कोल्हापुरातील कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. कोल्हापुरात आज मुख्यतः निरभ्र आकाश असू शकतं.
advertisement
4/6
सांगलीतील कमाल तापमानात वाढ होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. सांगलीतील कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. सांगलीत आज मुख्यतः निरभ्र आकाश असू शकतं.
advertisement
5/6
सोलापूरमधील तापमानात उन्हाळ्याच्या सुरूवातीपासूनच वाढ बघायला मिळत आहे. आज तेथील कमाल तापमानात वाढ होऊन ते 39 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. त्याठिकाणी आज निरभ्र आकाश असण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांत सोलापुरातील तापमानात वाढ होऊन ते 41 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
advertisement
6/6
पश्चिम महाराष्ट्रातील तापमानात आता पुन्हा वाढ होताना दिसून येत आहे. सोलापुरातील तापमानात वाढ होऊन ते पुढील 24 तासांत 41 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना चांगलाच उकाडा सहन करावा लागण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Update: 24 तास महत्त्वाचे, सोलापुरात पारा पुन्हा चढला, पाहा पश्चिम महाराष्ट्रातील हवामान अंदाज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल