TRENDING:

Weather Alert: अर्ध्या महाराष्ट्रात पाऊस अन् पुणे ते कोल्हापूर वेगळीच स्थिती, पाहा आजचं हवामान

Last Updated:
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. पुणे आणि साताऱ्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
1/7
अर्ध्या महाराष्ट्रात पाऊस अन् पुणे ते कोल्हापूर वेगळीच स्थिती, पाहा आजचं हवामान
राज्यात मे महिन्याच्या सुरुवातीलाच वातावरणात मोठे बदल जाणवत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि पुणे जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मागील 24 तासात सरासरी तापमान घटले असून कमाल तापमान 42.5 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17.6 अंश सेल्सिअस इतके राहिले. पश्चिम महाराष्ट्रातील आजचा तापमान आणि हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/7
सोलापुरात रविवारी 42.5 इतके सर्वाधिक तापमान नोंदले गेले. तर सोलापूर पाठोपाठ साताऱ्यातील पारा 39 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला. मागील काही दिवसांपासून उष्णतेने हैराण झालेल्या पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात येत्या 24 तासांत मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
advertisement
3/7
मागील काही दिवसांपासून 45 अंशापर्यंत तापलेल्या सोलापूर जिल्ह्यातील पारा अंशता कमी होऊन 42 अंशावर राहिला. तसेच सोलापुरात ढगांच्या गडगडाटासह एक दोन वेळा पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. ढगाळ वातावरणाने तापमान अंशतः कमी होऊन 41 अंशावर राहण्याचा अंदाज आहे.
advertisement
4/7
पुणे जिल्ह्यात उन्हाचा चटका कायम असून मागील 24 तासात 38.2 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर पुढील 24 तासात पुण्यातील पारा 38 अंशांवर राहण्याचा अंदाज आहे. तसेच अंशतः ढगाळ आकाशासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
advertisement
5/7
कोल्हापुरातील पारा 37 अंशापर्यंत असून पुढील 24 तासात तापमानात घट राहील. कमाल 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस इतके राहील. दुपारनंतर अंशतः ढगाळ आकाशासह एक दोन वेळा पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
6/7
सातारा जिल्ह्यातील कमाल पारा 39 अंश सेल्सिअस तर किमान 25 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. मागील 24 तासात साताऱ्यातील पारा 39.2 अंशांवर राहिला. या काळात ढगाळ आकाशासह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
advertisement
7/7
सांगली जिल्ह्यातील कमाल तापमानात अंशतः घट दिसून येते. मागील 24 तासात सांगलीत 38.7 अंश सेल्सिअस तापमान राहिले. तसेच येत्या 24 तासात जिल्ह्यातील तापमान 38 अंशावर स्थिर राहण्याचा अंदाज आहे. दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार होईल. एक दोन वेळा गडगडाटी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: अर्ध्या महाराष्ट्रात पाऊस अन् पुणे ते कोल्हापूर वेगळीच स्थिती, पाहा आजचं हवामान
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल