TRENDING:

उकाडा गेला आता 24 तास धोक्याचे! विजा कडाडणार, पाऊस झोडपणार, कोल्हापूर, साताऱ्याला अलर्ट

Last Updated:
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रावरील अवकाळी संकट कायम आहे. आज पुन्हा कोल्हापूरसह सातारा जिल्ह्याला वादळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
1/7
विजा कडाडणार, पाऊस झोडपणार, कोल्हापूर, साताऱ्याला अलर्ट, 24 तास धोक्याचे!
राज्यात वादळी पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात मोठी घट झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात 38.7 अंश सेल्सिअस सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. पुढील काही दिवस पश्चिम महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता असून तापमानात देखील चढ-उतार राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
advertisement
2/7
सातारा जिल्ह्यातील कमाल पारा 37 अंश सेल्सिअस तर किमान 23 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. या काळात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. जिल्ह्यातील कराड परिसरात मागील 24 तासात पावसाने जोरदार हजेरी लावली असून पुढील पाच दिवस देखील साताऱ्याला सतर्कतेचा येलो अलर्ट दिला आहे.
advertisement
3/7
गुरुवारी कोल्हापुरातील तापमान 35.4 अंश सेल्सिअस राहिले. ढगाळ हवामान असल्याने वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला आहे. पुढील 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता असल्याने भारतीय हवामान विभागाने सतर्कतेचा यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
4/7
सोलापूर जिल्ह्यातील पारा कमी होऊन 38.7 अंशावर राहिला. तसेच सोलापुरात ढगाळ आकाशासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तापमान 39 अंशावर राहण्याचा अंदाज आहे.
advertisement
5/7
सांगली जिल्ह्यातील कमाल तापमानात अंशतः घट दिसून येते. मागील 24 तासात सांगलीत 37.3 अंश सेल्सिअस तापमान राहिले. तसेच येत्या 24 तासात जिल्ह्यातील तापमान 37 अंशावर स्थिर राहण्याचा अंदाज आहे. ढगाळ आकाशासह हलक्या रिमझिम पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
advertisement
6/7
पुणे जिल्ह्यात उन्हाचा चटका कायम असून मागील 24 तासात 33.7 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर पुढील 24 तासात पुण्यातील पारा 33 अंशांवर स्थिर राहण्याचा अंदाज आहे. तसेच वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
advertisement
7/7
पश्चिम महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांत आज अवकाळी पावसाची शक्यता असून कोल्हापूर आणि साताऱ्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. वादळी पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घेण्याची गरज आहे. तसेच विजांच्या काळात सुरक्षित ठिकाणी थांबावे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
उकाडा गेला आता 24 तास धोक्याचे! विजा कडाडणार, पाऊस झोडपणार, कोल्हापूर, साताऱ्याला अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल