TRENDING:

Rain Alert: गारपीट होणार, वादळी पाऊस झोडपणार, कोल्हापूर, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्राला अलर्ट

Last Updated:
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रात पुढील 4 दिवसांसाठी वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे, कोल्हापूरसह पाचही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता आहे.
advertisement
1/7
गारपीट होणार, वादळी पाऊस झोडपणार, कोल्हापूर, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्राला अलर्ट
राज्यात पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली असून, वादळी पावसाचे सावट कायम आहे. पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील 21 जिल्ह्यांना वादळी पावसासह गारपिटीचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील 24 तासातील पश्चिम महाराष्ट्रात असणारे जिल्हा निहाय हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/7
पुढील 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यातील कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस राहील. गेल्या काही दिवसापासून ढगाळ राहिलेल्या वातावरणात मोठे बदल जाणवत आहेत. आज दुपारनंतर गारपीट आणि विजांच्या कडकडाटासह 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाचे वारे वाहण्याचा अंदाज आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पुढील 24 तास सतर्कतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
3/7
सातारा जिल्ह्यात अवकाळीचे ढग कायम असून येत्या 24 तासात विजांच्या कडकडाटासह 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाचे वारे तसेच गारपिटीचा अंदाज आहे. पुढील चार दिवस साताऱ्यास यलो अलर्ट असून नागरिकांनी दक्ष राहणे गरजेचे आहे.
advertisement
4/7
रविवारी सांगलीच्या शिराळा तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. पुढील 24 तासातील हवामान बदल महत्त्वाचे ठरणार असून ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगवान वाऱ्याचे शक्यता आहे. दुपारनंतर विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाचे सावट आहे. यावेळी कमाल तापमाना 38 अंशावर तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस वर राहील.
advertisement
5/7
सोलापूर जिल्ह्यातील पारा कमी होऊन 37 अंशावर राहील. तसेच सोलापुरात ढगाळ आकाशासह मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. वादळी पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
6/7
पुणे जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून मागील 24 तासात 35.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर पुढील 24 तासात पुण्यातील पारा 35 अंशांवर स्थिर राहण्याचा अंदाज आहे. तसेच वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा यलो अलर्ट भारतीय हवामान विभागाने जारी केला आहे.
advertisement
7/7
पश्चिम महाराष्ट्रातील सरासरी कमाल तापमान 38.9 अंश सेल्सिअसवर राहिले. पूर्व-मध्य अरबी समुद्रापासून सौराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. मराठवाड्यापासून उत्तर अंतर्गत कर्नाटक, तामिळनाडू ते मनारच्या आखातापर्यंत हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्ट कायम आहे. यामुळे राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Rain Alert: गारपीट होणार, वादळी पाऊस झोडपणार, कोल्हापूर, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्राला अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल