Rain Alert: ताशी 50 किमी वेगाने वारे वाहणार, अवकाळी झोडपणार, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्राला अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रात आज पुन्हा वादळी पावसाची शक्यता आहे. पुणे, कोल्हापूरसह सर्वच जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
1/7

राज्यात पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली असून पश्चिम महाराष्ट्रास झोडपून काढले आहे. आज 14 मे रोजी देखील अवकाळी पावसास पोषक हवामान असून सांगली, सातारा, कोल्हापूरसह पुणे जिल्ह्याला सतर्कतेचा यलो अलर्ट दिला आहे. पुढील 24 तासातील पश्चिम महाराष्ट्रात असणारे जिल्हा निहाय हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/7
सातारा जिल्ह्यातील विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावली असून 11 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासासाठी साताऱ्यात गडगडाटी पावसाचा यलो अलर्ट आहे. यावेळी ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगवान वाऱ्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. कमल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतके राहिल.
advertisement
3/7
सांगली जिल्ह्यातील पलूस, कडेगाव, वाळव्यासह विविध ठिकाणी मध्यरात्री जोरदार अवकाळी पाऊस कोसळला. आज कमाल तापमान 36 अंशांवर तर किमान तापमान 24 अंशांवर राहिल. आकाश अंशतः ढगाळ राहून मध्यम पावसाची शक्‍यता आहे. 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाच्या वादळी वाऱ्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
4/7
सोलापूर जिल्ह्यातील पारा 38 अंशावर राहिल. तसेच सोलापुरात ढगाळ आकाशासह मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. वादळी पाऊस आणि गारपिटीचा अंदाज असल्याने सतर्कतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
5/7
पुणे जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून मागील 24 तासात 36.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर पुढील 24 तासात पुण्यातील पारा 37 अंशांवर जाण्याचा अंदाज आहे. तसेच वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज असल्याने यलो अलर्ट भारतीय हवामान विभागाने जारी केला आहे.
advertisement
6/7
कोल्हापूर जिल्ह्यात 20 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील आकाश अंशतः ढगाळ राहून मध्यम पाऊस किंवा गडगडाटी वादळाची शक्यता आहे. यावेळी ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगवान वारे वाहील. जिल्ह्यातील कमाल तापमान 24 अन् कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस राहिल.
advertisement
7/7
पूर्व-मध्य अरबी समुद्रापासून सौराष्ट्रपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. विदर्भापासून मराठवाडा ते उत्तर केरळपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान आहे. राज्यात वादळी पाऊस हजेरी लावत असून पुढील 24 तासात देखील राज्यातील बहुतांश जिल्ह्यांसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात वादळी पाऊस बरसणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Rain Alert: ताशी 50 किमी वेगाने वारे वाहणार, अवकाळी झोडपणार, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्राला अलर्ट