Weather Alert: वारं फिरलं, पुणे ते कोल्हापूर विचित्र हवामान, ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी IMD चा अलर्ट
- Reported by:Priti Nikam
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. आज खंडेनवमीच्या दिवशी पुणे ते कोल्हापूर हवामानाची विचित्र स्थिती अनुभवाला येणार आहे.
advertisement
1/7

गेल्या दोन दिवसांत कमी दाब प्रणाली गुजरातकडे सरकून जाताच महाराष्ट्रातील पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र 2-3 दिवसांच्या ब्रेकनंतर राज्यात पुन्हा पावसाचं आमगन होणार आहे. आज 1 ऑक्टोबरला विदर्भातून पावसाचं धुमशान सुरू होईल. पश्चिम महाराष्ट्रात हवामान आणि पावसाची स्थिती काय राहील? याबाबत पुणे ते कोल्हापूर जिल्हानिहाय हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/7
पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर परिसरात मंगळवारी 0.5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यावेळी 28.2 अंश सेल्सिअस कमाल तापमान राहिले. आज पुणे जिल्ह्यासह घाटमाथ्यावर ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची शक्‍यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
advertisement
3/7
गेल्या 24 तासात सातारा जिल्ह्यातील कमाल तापमान 28.2 अंश सेल्सिअस इतके राहिले. वादळी वाऱ्यासह 1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आज संपूर्ण साताऱ्यासह सातारा घाटमाथ्यावर ढगाळ आकाशासह मध्यम पावसाची शक्‍यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
advertisement
4/7
कोल्हापूर जिल्ह्यात सप्टेंबर अखेरच्या दिवशी 2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आज जिल्ह्यात कमाल तापमान 27 अंशावर राहिल. पुढील 24 तासात कोल्हापूरसह घाटमाथ्यावर ढगाळ आकाशासह मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
5/7
सोलापूर जिल्ह्यात मागील 48 तासांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. पाऊस कमी होताच तापमानात वाढ झाली आहे. 30 सप्टेंबर रोजी 30.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. येत्या काळात तापमानात आणखी चढ-उतार होऊ शकतो.
advertisement
6/7
सांगली जिल्ह्यातील काही ठिकाणी मागील 24 तासात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची नोंद झाली. यावेळी कमाल तापमान 28.2 अंश सेल्सिअस इतके राहिले. पुढील 24 तासात जिल्ह्यात ढगाळ आकाशासह मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
7/7
दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होऊन पहाटे धुके तर दिवसभर रिमझिम पावसासह कडक ऊन असे मिश्र हवामान झाले आहे. काही ठिकाणी ढगाळ आकाशासह मध्यम पावसाची नोंद होईल. मुख्यतः तापमानात काही अंशी वाढ होऊन अतिवृष्टीचा फटका बसलेल्या परिसरास काहीसा दिलासा मिळेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: वारं फिरलं, पुणे ते कोल्हापूर विचित्र हवामान, ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी IMD चा अलर्ट