Weather Update : सोलापूर सर्वाधिक उष्ण जिल्हा, पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल, या जिल्ह्यांना यलो अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
मे महिन्याच्या सुरुवातीला राज्यात उन्हाचा चटका कायम असून कमाल तापमानात चढ-उतार जाणवणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील 3 जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
1/7

मे महिन्याच्या सुरुवातीला राज्यात उन्हाचा चटका कायम असून कमाल तापमानात चढ-उतार जाणवणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यांस उष्ण व दमट हवामानाचा येलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.उर्वरित जिल्ह्यात निरभ्र आकाश आणि कमाल तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. एप्रिल अखेरच्या दिवशी मागील 24 तासात सोलापूर पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक उष्ण जिल्हा ठरला. तर पश्चिम महाराष्ट्रातील सरासरी तापमान 21.1 ते 41.5 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहीले. पश्चिम महाराष्ट्रातील पुढील 24 तासातील हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/7
सोलापुरातील कमाल तापमान 43.6 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 28.2 अंश सेल्सिअस इतके होते. पुढील 24 तास सोलापुरास उष्ण व दमट हवामानाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. यावेळी आकाश निरभ्र राहून जिल्ह्यातील कमाल तापमान 43 अंशांवर तर किमान तापमान 26 अंशांवर राहिल.
advertisement
3/7
सातारा जिल्ह्यातील पारा अंशतः वाढत असून कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. मागील 24 तासात साताऱ्यातील पारा 40.7 अंशांवर राहिला होतो. तसेच भारतीय हवामान विभागाने येत्या 24 तासासाठी सातारा जिल्ह्यात उष्ण व दमट हवामानाचा येलो अलर्ट दिला आहे.या काळात आकाश निरभ्र राहील.
advertisement
4/7
पुणे जिल्ह्यात उन्हाचा चटका कायम असून मागील 24 तासात 39.7 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर पुढील 24 तासात पुण्यातील पारा 40 अंशांवर जाण्याचा अंदाज आहे. पुण्यातील आकाश मुख्यता निरभ्र राहील. भारतीय हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी उष्ण व दमट हवामानाचा येलो अलर्ट दिला आहे.
advertisement
5/7
सांगली जिल्ह्यात उन्हाची होरपळ कायम आहे. तापमानात अंशता घट जाणवली. मागील 24 तासात जिल्ह्यात 37.7 कमल तापमानाची नोंद झाली. पुढील 24 तासात पारा अंशतः वाढून कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहिल. सांगली जिल्ह्यात आकाश मुख्यता निरभ्र राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
advertisement
6/7
कोल्हापुरातील पारा 36 अंशापर्यंत घटला असून पुढील 24 तासात कोल्हापुरातील तापमानात अंशत वाढ राहील. कमाल 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतके राहील.
advertisement
7/7
आकाश निरभ्र राहील. नैऋत्य राजस्थानात तसेच वायव्य मध्य प्रदेशात परिसरावर समुद्र सपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती आहेत. मध्य प्रदेशातील चक्राकार वाऱ्यांपासून विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक ते तमिळनाडूपर्यंत दक्षिणोत्तर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. राज्यात उन्हाचा चटका कमी अधिक होत असून, उकाडा कायम आहे. नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक ठरेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Update : सोलापूर सर्वाधिक उष्ण जिल्हा, पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल, या जिल्ह्यांना यलो अलर्ट