TRENDING:

Pune Rain: 24 तास हायअलर्ट! कोल्हापूर, सांगलीला धो धो कोसळणार, पुण्यात काय स्थिती?

Last Updated:
Pune Rain Alert: पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. आज कोल्हापूर, सांगलीत जोरदार पावसाची शक्यता असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
1/7
24 तास हायअलर्ट! कोल्हापूर, सांगलीला धो धो कोसळणार, पुण्यात काय स्थिती?
राज्यभरात वादळी पावसाने पुन्हा जोर धरला आहे. मान्सूनच्या प्रतिक्षेत कमाल तापमान चाळीशीपार गेले आहे. आज 12 जून रोजी दक्षिण मध्य महाराष्ट्रासह विदर्भात वादळी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात विजांसह जोरदार पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. 
advertisement
2/7
पुढील 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. यावेळी 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वादळी वारे वाहतील. हवामान विभागाने 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस वर असेल.
advertisement
3/7
पुढील 24 तासात सांगली जिल्ह्यात प्रतितास 40 ते 50 किलोमीटर वेगवान वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज आहे. गडगडाटी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. यावेळी जिल्ह्यातील कमाल तापमान 32 तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस इतके राहील.
advertisement
4/7
साताऱ्यातील पारा 31.8 अंश सेल्सिअसवर राहिला. पुढील 24 तासात सातारा जिल्ह्यातील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस राहिल. जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह प्रतितास 40-50 किलोमीटर वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
5/7
पुढील 24 तासात सोलापूर जिल्ह्यातील कमाल तापमानात अंशतः घट होऊन पारा 28 अंशावर राहील. तसेच यलो अलर्टसह मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
advertisement
6/7
पुणे जिल्ह्यात मागील 24 तासात 30.7 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. पुढील 24 तासात कमाल तापमान 30 अंशावर राहिले. आज हवामान विभागाने हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.
advertisement
7/7
गेल्या दोन आठवड्यांपासून मान्सून वाटचालीची सीमा 'जैसे थे' आहे. मान्सूनच्या वाटचालीस पोषक हवामान होत असल्याने शनिवारपासून मध्य भारत आणि पूर्व भारताच्या काही भागात मान्सूनची प्रगती होण्याची शक्यता आहे. तर राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याने नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Pune Rain: 24 तास हायअलर्ट! कोल्हापूर, सांगलीला धो धो कोसळणार, पुण्यात काय स्थिती?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल