आजचं हवामान: कोल्हापूर ते पुणे पावसाचं धुमशान, या भागाला हायअलर्ट, 24 तास धोक्याचे!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
Pune Rain Alert: राज्यासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला असून आज कोल्हापूर ते पुणे घाट भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
1/7

.राज्यात मान्सून सक्रीय झाला असून पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाचा जोर कायम आहे. आज 16 जून रोजी पुणे ते कोल्हापूर घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहण्याची शाक्यता आहे. हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे.
advertisement
2/7
पुणे जिल्ह्यात मागील 24 तासात 32.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तसेच पुणे शहर आणि चिंचवड परिसरात पारत्येकी 60 मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला. पुढील 24 तासात कमाल तापमान 32 अंशावर राहिल. पुण्यामध्ये पावसाने उघडीत घेतली असली तरीही घाटमाथ्यावर पावसाची शक्यता असून हवामान विभागाने दक्षतेचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
advertisement
3/7
साताऱ्यातील पारा 29.3 अंश सेल्सिअसवर राहिला. तसेच मागील 24 तासात 31 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासात सातारा जिल्ह्यातील कमाल तापमान 32 अंशावर राहील. जोरदार पावसाची शक्यता असल्याने घाटमाथ्यास सतर्कतेचा ऑरेंज अलर्ट वर्तवण्यात आला आहे. सातारा परिसरात मध्यम पावसाची शक्यता आहे.
advertisement
4/7
मागील 24 तासात कोल्हापूर परिसरात 5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तसेच गगनबावडा, आजरा परिसरात प्रत्येकी 30 मिलीमीटर पावसाची नोंद झली. पुढील 24 तासात कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने कोल्हापूरच्या घाटमाथ्यास सावधानतेचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसेच कोल्हापूर परिसरात हलका पाऊस पडेल.
advertisement
5/7
गेल्या 24 तासात सांगली जिल्ह्यात 5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आज सांगली जिल्ह्यात सोसाट्याचाय वाऱ्यासह एक- दोन वेळा जोरदार पावसाचा अंदाज आहे. यावेळी जिल्ह्यातील कमाल तापमान 31 तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतके राहील.
advertisement
6/7
सोलापूर जिल्ह्यातील कमाल तापमान आज 34 अंशावर राहील. सोलापूर जिल्ह्याला कोणताही महत्त्वाचा अलर्ट देण्यात आलेला नाही. मात्र, काही ठिकाणी ढगाळ आकाशासह हलक्या पावसाचा अंदाज आहे.
advertisement
7/7
दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून 7.6 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
आजचं हवामान: कोल्हापूर ते पुणे पावसाचं धुमशान, या भागाला हायअलर्ट, 24 तास धोक्याचे!