Weather Alert : 13 मे ला पश्चिम महाराष्ट्रात वादळ थैमान घालणार? शेतकरी आणि प्रवासी सावध!
- Published by:Mohan Najan
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पावसाने तडाखा दिला आहे. वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पावसाचे सावट कायम आहे. आज दिनांक 13 मे रोजी पश्चिम महाराष्ट्राला वादळी वाऱ्यासह गारपिटीचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
1/7

पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पावसाने तडाखा दिला आहे. वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पावसाचे सावट कायम आहे. आज दिनांक 13 मे रोजी पश्चिम महाराष्ट्राला वादळी वाऱ्यासह गारपिटीचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सोमवार दिनांक 12 रोजी अकोला येथे राज्यातील उच्चांकी 41.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील पारा 38.9 सेल्सिअस वर पोहोचला. पश्चिम महाराष्ट्रातील सरासरी तापमान 18.1 ते 38.9 अंश सेल्सिअस दरम्यान राहीले. पुढील 24 तासातील पश्चिम महाराष्ट्रात असणारे जिल्हा निहाय हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/7
कोल्हापूर जिल्ह्यातील आकाश अंशतः ढगाळ राहून मध्यम पाऊस किंवा गडगडाटी वादळाची शक्यता आहे. यावेळी ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगवान वारे वाहील. जिल्ह्यातील कमाल तापमान 23 अन् कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस राहिल. कोल्हापुरातील तुरळक ठिकाणी मागील 24 तासात अवकाळी बरसला.
advertisement
3/7
सांगली जिल्ह्यातील कमाल तापमान 37 अंशांवर तर किमान तापमान 24 अंशांवर राहिल. आकाश अंशतः ढगाळ राहून मध्यम पावसाची शक्‍यता आहे. 50 ते 60 किलोमीटर प्रतितास वेगाच्या वादळाची शक्यता असल्याने भारतीय हवामान विभागाने दक्षतेचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
advertisement
4/7
सातारा जिल्ह्यात अवकाळीचे ढग कायम असून येत्या 24 तासात विजांच्या कडकडाटासह 50 ते 60 किलोमीटर प्रतितास वेगाचे वारे तसेच गारपिटीचा अंदाज असल्याने दक्षतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुढील चार दिवस साताऱ्यास येलो अलर्ट असून नागरिकांनी दक्ष राहणे गरजेचे आहे.
advertisement
5/7
सोलापूर जिल्ह्यातील पारा अंशतः वाढून 38.9 अंशावर राहिल. तसेच सोलापुरात ढगाळ आकाशासह मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. वादळी पाऊस आणि गारपिटीचा अंदाज असल्याने दक्षतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
6/7
पुणे जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून मागील 24 तासात 36.2 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर पुढील 24 तासात पुण्यातील पारा 35 अंशांवर स्थिर राहण्याचा अंदाज आहे. तसेच वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज असल्याने दक्षतेचा ऑरेंज अलर्ट भारतीय हवामान विभागाने जारी केला आहे.
advertisement
7/7
आज पश्चिम महाराष्ट्रातील सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर तसेच पुणे जिल्ह्यांना वादळी पावसासह गारपीटीची शक्यता असल्याने दक्षतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पूर्व मोसमी पावसाने शेतीस नुकसान होत असून शेतकऱ्यांनी योग्य ती दक्षता घेणे गरजेचे आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert : 13 मे ला पश्चिम महाराष्ट्रात वादळ थैमान घालणार? शेतकरी आणि प्रवासी सावध!