Pune Weather : पश्चिम महाराष्ट्रात हवामानाची विचित्र स्थिती, पुण्यातही मोठे बदल, पाहा हवामान अपडेट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. आज दिनांक 31 मे रोजी देखिल पश्चिम महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
advertisement
1/7

वेळेआधी दाखल झालेल्या मॉन्सूनचे प्रवाह कमजोर झाल्याने राज्यातील पाऊस ओसरण्याचे संकेत आहे. विदर्भात वादळी वारे, विजांसह पावसाची शक्यता आहे. राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. आज दिनांक 31 मे रोजी देखिल पश्चिम महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
advertisement
2/7
मागील काही दिवसांपासून अंशतः घटलेले पुण्याचे कमाल तापमान पुन्हा 33 अंश सेल्सिअस इतके वाढणार आहे. पुढील 24 तासात पुण्यातील आकाश ढगाळ ढगाळ राहण्याचे संकेत आहेत. पुणे आणि पुण्याचा घाट परिसरात देखील पावसाची उघडीप राहिल. यावेळी कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहिल.
advertisement
3/7
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने उघडीत दिली असून 31 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. पुढील 24 तासात देखील पावसाची उघडी कायम असून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामाना विभागाने वर्तविली आहे. कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर हलक्या पावसाची शक्यता आहे.
advertisement
4/7
मे महिन्याच्या पावसाने झोडपलेला सातारा निसर्ग सौंदर्याने बहरतो आहे. जिल्ह्यात पावसाने उघडीत घेतली असून कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस राहिल. पुढील 24 तासात अंशतः आकाशासह तुरळक ठिकाणी रिमझिम पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून सांगण्यात आला आहे.
advertisement
5/7
अवकाळी पावसाने सांगली जिल्ह्यातून काढता पाय घेतला असून गेल्या तीन दिवसात जिल्ह्यात कुठेही पावसाची नोंद झाली नाही. मागील 24 तास 32.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तसेच पुढील 24 तासात तू ओळख ठिकाणी हलक्या पावसासह आकाश ढगाळ असेल.
advertisement
6/7
मागील 24 तासात सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे 50 मिलिमीटर, अक्कलकोट 20 तसेच सोलापुर परिसरात 30 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस इतके वाढले आहे. पुढील 24 तासात ढगाळ आकाशासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
advertisement
7/7
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र जमिनीवर आले असून बांग्लादेशातील ढाक्यापासून वायव्येकडे 110 किलोमीटर उंचीवर आहे. भारताच्या बेहरामपूरपासून उत्तरेकडे 140 किलोमीटर आणि शिलाँगपासून 260 किलोमीटर नैऋत्यकडे होते. ईशान्येकडे सरकत असलेली ही प्रणाली निवळू लागली. या प्रणालीची तीव्रता हळूहळू ओसरणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Pune Weather : पश्चिम महाराष्ट्रात हवामानाची विचित्र स्थिती, पुण्यातही मोठे बदल, पाहा हवामान अपडेट