TRENDING:

Weather Alert: पुणे ते कोल्हापूर पुन्हा हायअलर्ट, पश्चिम महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांचा हवामान अंदाज

Last Updated:
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम आहे. पुणे घाटभागात आज पुन्हा रेड अलर्ट देण्यात आला असून 5 जिल्ह्यांतील हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
1/7
पुणे ते कोल्हापूर हायअलर्ट, पश्चिम महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांचा हवामान अंदाज
राज्यातील काही भागात पावसाने कहर केला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टीने पूरजन्य परिस्थिती उद्भवली असताना आज 20 ऑगस्ट रोजी कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. रायगडसह पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असल्याने सावधानतेचा रेड अलर्ट कायम आहे.
advertisement
2/7
मागील 72 तासांपासून रेड अलर्ट वर असलेल्या सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे. कोयना धरण परिसरामध्ये असलेल्या संततधारेने कोयना धरणाची पाणी पातळी 100 टीएमसीकडे पोहचली आहे. पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी 89,100 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणाचे सहा वक्र दरवाजे बारा फुटांपर्यंत उघडले आहेत. पुढील 24 तासात देखील सातारा घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे पाणी पातळीत अनखी वाढ होणार असून नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
3/7
कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. गगनबावडा, शाहुवाडी, पन्हाळा, राधानगरी, भुदरगड, आजरा या तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसला. राधानगरी धरणातून 11500 क्युसिक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 24 तासात कोल्हापूर घाटमाथ्यास मुसळधार पावसाची शक्‍यता असल्याने दक्षतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या 24 तासात कोल्हापूर परिसरात 67 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
advertisement
4/7
पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत असून शिवाजीनगर परिसरात मागील 24 तासात 35.2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तसेच कमाल तापमानाचा पारा 24.2 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले. पुढील 24 तासात पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज असल्याचे सावधानतेचा रेड अलर्ट कायम आहे.
advertisement
5/7
सोलापूर परिसरात मागील 24 तासात 8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तसेच 25 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. पुढील 24 तासात कमाल तापमान 27 अंशावर राहिल. तसेच आज सोलापूर जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
advertisement
6/7
सांगली जिल्ह्यामध्ये मंगळवारी 25 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तसेच कमाल तापमानात घट होवून 24.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज मध्यम पावसाची शक्यता असून कोयना आणि वारणा धरण क्षेत्रामध्ये होत असलेल्या अतिवृष्टीने नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे कृष्णा नदीकाठी सांगली जिल्ह्यामध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. आज आणि उद्या जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
advertisement
7/7
पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा कहर सगळीकडे सुरू आहे. त्यामुळे पंचगंगा, कृष्णा, भीमा आणि इतर नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. अशातच पुढील 48 तास पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: पुणे ते कोल्हापूर पुन्हा हायअलर्ट, पश्चिम महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांचा हवामान अंदाज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल