TRENDING:

Pune Rain Alert : तुफान आलंया! 50 किमी वेगाने वारे वाहणार, पुण्यात मुसळधार पाऊस पडणार!

Last Updated:
मागील सहा दिवसांपासून दिवसांपासून संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले आहे. पुढील 24 तास संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता कायम असल्याने हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
1/6
तुफान आलंया! 50 किमी वेगाने वारे वाहणार, पुण्यात मुसळधार पाऊस पडणार!
राज्यभरामध्ये ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस कोसळतो आहे. मागील सहा दिवसांपासून दिवसांपासून संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले आहे. पुढील 24 तास संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता कायम असल्याने हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
2/6
पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी जोरदार पाऊस कोसळतो आहे. त्यामध्ये विविध ठिकाणी पावसाची नोंद होत असून सततच्या पावसाने तापमानात घट झाली आहे. पुढील 24 तासात पुणे आणि पुणे घाट प्रदेशातील एक दोन ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. यावेळी पुण्यातील कमाल तापमान 26 अंश सेल्सिअस इतके राहील. मुसळधार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा यलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
advertisement
3/6
मागील 6 दिवसांपासून सातारा जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस कोसळतो आहे. बऱ्याच ठिकाणी झाडे उन्मळून पडली, वीजपुरवठा खंडित झाला. साताऱ्यातील तापमान 30 अंशापर्यंत घटले आहे. पुढील 24 तासात 40 ते 50 किमी प्रतितास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असून दक्षतेचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.
advertisement
4/6
पुढील 24 तासात कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्‍यता असल्याने तसेच कोल्हापुरात ताशी 40 ते 50 किमी प्रतितास वेगाचे वाऱ्याची शक्यता सतर्कतेचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.
advertisement
5/6
सांगली जिल्ह्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस असून पुढील 24 तास देखिल गडगडाटी वादळासह मध्यम पावसाची शक्यता आहे. यावेळी जिल्ह्यातील कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस राहिल. जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून दिवस-रात्र पावसाची रिपरिप सुरूच आहे. पुढील 24 तासात 40 ते 50 किमी प्रतितास वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा यलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
advertisement
6/6
पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातला असून शेतामध्ये पाणी साचले आहे. यामुळे मशागतीची कामे खोळंबली असून पेरणी, ऊस लागणी तसेच हळद लागणी लांबणीवर पडल्या आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Pune Rain Alert : तुफान आलंया! 50 किमी वेगाने वारे वाहणार, पुण्यात मुसळधार पाऊस पडणार!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल